पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १०

 वैदिक सणांचे योग रहस्य-भाग १० त्रिपुरी पौर्णिमा                त्रिपुरी पौर्णिमा पौर्णिमेला येते. या दिवशी भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केला. हा त्रिपुरासुर कोण व कोठे राहत होता?  त्याला शिवाने कसे मारले ? तीन परकोटांच्या आत लपून बसून तेथून देवांना त्रास देणारा असा हा त्रिपुर होता. वाईट कर्म करत असे म्हणून तो असुर होता. हे सुर असुर वा देव दानव कोण ? मुद्रा प्रकरणात मुद्रेची महती सांगताना वर्णन केले आहे, 'मुदं ददाति देवानां द्रापयति असुरानपि' म्हणजे साधकाच्या दैवी शक्तिंना आनंद देणारी आणि असुर शक्ती निर्मूलन करणारी ती मुद्रा, तेव्हा सुर किंवा असुर या साधकातील योग्य किंवा अयोग्य साधनावस्था होत. असा हा प्रबल त्रिपुरासुर साधकाच्या दैवी शक्तींना त्रास द्यायचा आणि त्रास देऊन तो आपल्या तीन परकोटांनी सुरक्षित असलेल्या पुरात लपून बसायचा. हे तीन परकोट कशाचे होते ? तर बाहेरील परकोट चांदीचा, त्या आंतील सुवर्णाचा आणि सर्वात आतील लोहाचा होता. थोडा विचार केल्यास असे दिसून येईल की कितीही श्रीमंत माणूस असला तरी आपल्या नगर...

वैदिक सणांचे योग रहस्य-भाग ९

 वैदिक सणांचे योग रहस्य-भाग ९ आवळी अष्टमी किंवा गोपाष्टमी                निरोगी आणि दीर्घ जीवनाकरिता आवळयाचे महत्व आयुर्वेदात फार आहे. याच आवळयाचा उपयोग पुढे द्वादशीला तुळशी विवाहात करतात. याच आवळयाचे प्राशन करून च्यवन भार्गव ऋषीला तारूण्य प्राप्त झाले होते. च्यवनप्राश उत्तम आणि दीर्घ जीवनाकरिता वापरतात. त्याच दिवशी गोपाष्टमी साजरी करतात. कृष्ण आठवा, योगमार्ग आठ भागांचा आणि त्यामुळे जो याचा अवलंब करून आत्मज्ञान प्राप्त करेल तोच पुढे भगवान श्रीकृष्ण होऊ शकेल. इंद्रियातील गुप्तशक्तिंना साक्ष ठेवून भगवान श्रीकृष्ण बनायचे हा हेतू गोपाष्टमी साजरी करण्यात आहे. एकादशीला विष्णू प्रबोधिनी एकादशी असते. मागे शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवान श्रीविष्णू आज जागृत होतात म्हणून या एकादशीला विष्णू प्रबोधिनी एकादशी म्हणतात. विष्णुप्रबोधनोत्सवाच्या दिवशी पंढरपूरची यात्रा असते. एकादशीला जागृत झालेल्या भगवंतांचा विवाह द्वादशीला तुलसीशी लागतो. तुलसी विवाह आणि चातुर्मास्य समाप्ती          ...

वैदिक सणांचे योग रहस्य-भाग ८ (गोवर्धनोत्सव)

 वैदिक सणांचे योग रहस्य-भाग ८ गोवर्धनोत्सव                 गोवर्धन म्हणजे जड पर्वताची पूजा का करायची ? वृंदावनातील सर्व गोप-गोपी भगवंतांचे पूजन करू लागले. इतके की त्याकाळी या दिवशी जी इंद्रपूजा व्हायची ती न करता स्वतःची पूजा करण्यास कृष्णाने सांगितले. साहजिकच इंद्राला राग आला.आपली पूजा मोडून स्वतःची पूजा करणारा हा कालचा मुलगा कोण? इंद्र पर्जन्याचा स्वामी ! तो पर्जन्याशिवाय कशाची बरसात करणार? इन्द्राला राग आला पण करणार काय? कृष्णाला विरोध करण्याचे इंद्रात सामर्थ्य नव्हते. त्याने आपल्या शक्तिनुसार पर्जन्याच्या सरीवर सरी कोसळविल्या. सर्वत्र पाणीच पाणी, आता काय करावे ? वृंदावन त्या पुरात बुडणार की काय अशी परिस्थिती उत्पन्न झाली. कृष्णाने गोवर्धन पर्वत उचलला आणि आपल्या करांगुलीवर धरला. भगवंत म्हणाले ‘लावारे आपापल्या काठ्यांचा आधार या गोवर्धनाला’. गोपांनी तसे केले. मध्यंतरी गोपांना दर्प झाला की आपल्याच काठ्यांवर हा गोवर्धन तोलला गेला आहे. कृष्णाने ते ताडले. करांगुलीचा आधार काढण्यास सुरूवात केली. गोवर्धन गडगडायला ल...

वैदिक सणांचे योग रहस्य-भाग ७ (समुद्र मंथन - धन्वंतरी जयंती)

 वैदिक सणांचे योग रहस्य-भाग ७ समुद्र मंथन - कुंडलिनी शक्ती जागृती व धन्वंतरी जयंती                रामायणात समुद्रमंथनाची कथा आली आहे. सुर आणि असुर आपापसात भांडून थकले. मग ब्रह्मदेवाच्या म्हणण्यावरून अमृत प्राप्तीच्या हेतूने त्यांनी समुद्रमंथन करायचे ठरविले. समुद्रमंथन म्हणजे ध्यानाद्वारे मनाचे व शरीराचे मंथन करून कुंडलिनी जागृत करणे व आत्मज्ञान प्राप्त करणे होय.मनाचा व शरीराचा परस्पर संबंध असतो. संस्कार बदलल्यास जीवात्म्याचे उपकरण- शरीर, ते सुद्धा बदलत असते. शरीरात रोग असल्यास मन अस्वस्थ असते. जसे मन तसे शरीर. म्हणून शुद्ध मन असलेले सर्व खरे संत सर्वगुणसंपन्न व दिसावयास सुंदरच असतात. उदा.ज्ञानेश्वर माऊली, स्वामी विवेकानंद.  हे कुंडलिनी जागृतीचे रहस्य आहे.                कुंडलिनी जागृतीद्वारे अमृत तत्वाचा लाभ देव व दानवांना होणार होता. पण सर्वप्रथम त्यांना हलाहल विष प्राप्त झाले. शेवटी अमृत तत्त्वाचा लाभ झाला. सुर म्हणजे आपल्यातील चांगल्या ...

वैदिक सणांचे योग रहस्य - भाग ६ (लक्ष्मी पूजन)

 वैदिक सणांचे योग रहस्य - भाग ६ लक्ष्मी पूजन                अमावस्येला संध्याकाळी लक्ष्मी पूजन करतात.आपल्या सर्व मुहूर्तांत अमावस्या वाईट मानली आहे. त्याला अपवाद दोनच. सर्वपित्री आणि लक्ष्मी पूजन. भौतिक व्यवहार जिच्यामुळे सुकर आणि सुखद होईल ती लक्ष्मी. प्राचीन काळात धनाची कल्पना गौ, भूमी, धान्य, अपत्ये आणि सुकिर्तीच्या रूपाने वसत होती. नंतरच्या काळात विनिमयाचे साधन जे सुवर्ण आणि मुद्रा त्याला महत्व आले. आज तीच कल्पना लक्ष्मीभोवती रेंगाळते आहे. वास्तविक साधना धर्माचा विचार केल्यास धनवान वा लक्ष्मीपुत्र तो की जो 'संपन्ननारायण स्मृती' असे मानतो. परंतु असे मानणाऱ्याला व्यवहारात स्थान नसते. अधिकांश लोक विनिमयाच्या माध्यमालाच लक्ष्मी समजतात आणि तिचे अमावस्येला पूजन करतात. साधकाला अप्रकाशातून प्रकाशाकडे जायचे असल्यामुळे सर्वच दृष्टीने त्याला हिरण्यमय व्यवहार नकोसा होतो म्हणून साधकांचे लक्ष्मीपूजन अमावस्येला असण्याचे कारण तरी होते. म्हणून प्रकाश प्राप्तीकरीता तो अप्रकाशापासून म्हणजे अमावस्येपासून आपल्या साधक जीवनाची सुरू...

वैदिक सणांचे योग रहस्य- भाग ५ (नरक चतुर्दशी)

 वैदिक सणांचे योग रहस्य- भाग ५ नरक चतुर्दशी                नरक चतुर्दशी पासून दीपावली सुरू होते. मोठ्या पहाटेस भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन गेले आणि त्यांनी नरकासुराचा वध करून त्याच्या बंदिवासात असलेल्या १६,१०० स्त्रियांना मुक्त केले आणि हस्तिनापुराला परत आले. परंतु नरकासुराला मारल्यामुळे त्याचे नरकतुल्य रक्त श्रीकृष्णार्जुनांच्या अंगावर सांडल्याने त्यांनी मोठ्या पहाटेसच अभ्यंगस्नान केले आणि ते नरकासुराच्या पापातून मुक्त झाले. चतुर्दशीलाच त्यांनी असले अभ्यंग स्नान केल्यामुळे तेव्हा पासून आपण नरक चतुर्दशीला मोठ्या पहाटे उठून सूर्योदयापूर्वीच स्नान करतो आणि जो असे ब्राह्ममुहूर्ती स्नान करणार नाही त्याचे अंगावर नरक पडेल असे मानतो. कथेच्याच दृष्टीने विचार केल्यास असे दिसून येईल की नरकासुराला मारले श्रीकृष्णार्जुनांनी व त्याचे नरकतुल्य रक्त त्यांचे अंगावर सांडले. पण त्याबद्दल शुध्द होण्याकरिता त्यांनीच स्नान करावयास हवे. पांडवांचा काळ आजपासून सहा सहस्रवर्षांपूर्वीचा मानल्यास त्यांनी तसले अभ्यंगस्नान सहा सहस्त्र वर्षापूर...

वैदिक सणांचे योग रहस्य- भाग ४ ( दशहरा व विजया दशमी)

 वैदिक सणांचे योग रहस्य- भाग ४ दशहरा व विजया दशमी                आश्विन शुध्द प्रतिपदेला घटस्थापना असते. देवी नवरात्राची सुरुवात या दिवशी असते. नवरात्रीतून साधकाच्या तंत्रसाधनेने संपन्न होणाऱ्या नवदुर्गा या काळात येतात. दुर्गेचे तंत्रज्ञान वैदिक काळापासूनच आहे. ऐन युध्दाच्या धुमश्चक्रीत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला देवी साधना करायला सांगितले होते. क्लीबावस्थेत नटणाऱ्या अर्जुनरूपी बृहन्नडेला याच दुर्गादेवीने शक्तिसंपन्न करून विजया दशमीच्या दिवशी कौरवांचा पराजय करण्यास सहाय्य केले होते. विजयादशमीच्या दिवशी प्रभु रामचंद्रांनी दैत्य रावणाचा निःपात केला होता. याच पराक्रमी तंत्रसाधनेची सुरूवात म्हणजे घटस्थापना आश्विन शुध्द प्रतिपदेला होत असते. साधकाच्या पुण्य पराक्रमाचा हा घट आजपासूनच नवरात्रीतून पूर्ण भरायचा असतो आणि नवरात्र संपल्यावर दहाव्या दिवशी सूर्य दर्शनाच्या वेळी कौरव वा रावणाचा नि:पात करायचा असतो. या दश संख्येला धरूनच साधक आणि साध्य याची रचना केलेली आहे. दाशरथी राम तर दशमुखी रावण. राम म्हणजे अतिशय आनंद देणारा...

वैदिक सणांचे योग रहस्य- भाग ३ (हरितालिका / गणेश चतुर्थी )

वैदिक सणांचे योग रहस्य- भाग ३ हरितालिका             स्त्रियांचा हा अतिशय महत्वाचा सण होय. या दिवशी सुवासिनी आणि कुमारीका परड्यांवर गव्हाची रोपे वाढवून गौरीची पूजा अर्चा करून आपापल्या महादेवाला प्रसन्न करीत असतात. हरिता म्हणजे पळविली गेलेली आणि अलि म्हणजे सखी. कोणी कोणाला पळविले आणि का म्हणून ? कथा अशी आहे की हिमालयाची कन्या पार्वती. तिचे महादेवावर प्रथमपासूनच प्रेम होते. परंतु नारद खट्याळ, त्यांनी हिमालयाच्या मनात भरविले की महादेव भणंग भिकारी. त्याला पार्वतीला देण्यापेक्षा चांगला वैभव संपन्न असलेल्या भगवान श्रीविष्णूला द्यावी. आपल्या मुलीला चांगले संपन्न स्थळ मिळावे अशी कोण्या बापाची इच्छा नसते ? हिमालयाने नारदाचा सल्ला ऐकला आणि श्रीविष्णूला पार्वतीस देण्याचे ठरविले. पार्वतीला हे पसंत नव्हते. ती पळून गेली आणि हिमालयाच्या गौरीशिखरावर बसून तिने महादेवाला प्रसन्न करण्याकरीता घोर तप आचरले. तिने अन्न वर्ज्य करुन व केवळ झाडाची पाने खाऊन आपला उदरनिर्वाह करण्याचे सुरु केले. शेवटी त्या गौरीशिखरावरील एकाही झाडाला पाने राहिली नाहीत. त्यामुळे प...

वैदिक सणांचे योग रहस्य- भाग २ (ऋतु / मास गणना)

वैदिक सणांचे योग रहस्य- भाग २ वैदिक सण वा उत्सव                वैदिक सण वा उत्सव अतिशुद्ध शास्त्रीय परंपरेवर आधारीत आहेत. त्यात व्यक्तिबद्दलची श्रध्दा म्हणजेच भावुकता तसेच इतरांबद्दल अनादर वा द्वेष नाही. वैदिक सणात ऐतिहासिक घटनांना प्राधान्य नाही की भौगोलिक अवस्थांचा बडेजाव नाही. वैदिक धर्म, परंपरा आणि संस्कृती कोणा एका प्रेषिताची मिरासदारी नसल्याने वैदिक सण, उत्सवात व्यक्तीचे जन्म दिवस वा त्यांच्या पराक्रमाला धरुन केलेल्या जल्लोषाला मुळीच स्थान नाही. येथे व्यक्तीचा बडेजाव नाही, की व्यक्तिद्वेष नाही, पंथाभिमानाने पेटून केलेल्या युध्दसंचाराचा जल्लोष नाही, की काल्पनिक विजयाचा उन्माद नाही. येथे आहे निव्वळ शास्त्रीयता. पण ती शास्त्रीयता शर्करावगुंठित गोळ्यांप्रमाणे आहे. त्या शर्करावगुंठित गोळ्यांच्या आत कोणते औषधी संस्कार आहेत हे पाहण्याकरीताच वैदिक सण उत्सवांचा योग्य विचार करुन त्यातील यौगिक रहस्य शोधून काढायची आहेत. वैदिक ऋतुंची नावे सुद्धा याच शास्त्रीय परंपरेला धरून आहेत. ऋतु म्हणजे काय?      ...

वैदिक सणांचे योग रहस्य- भाग १ (ज्ञान / संस्कार)

  वैदिक सणांचे योग रहस्य- भाग १   वैदिक परंपरा         ज्ञान म्हणजे काय ?                ' विद् ’ म्हणजे जाणणे. जाणून वागण्याची रीत म्हणजे वैदिक परंपरा होय. जाणणे हा मराठी शब्द ' ज्ञान ' या संस्कृत शब्दाचे अपत्य आहे. ज्ञान या शब्दाचा उच्चार मराठीत   ' द्न्यान ’ असा आहे. परंतु तो चुकीचा आहे. त्याचा खरा उच्चार ‘ ज्याँन ' असा आहे. या ‘ ज्याँन ' शब्दापासून मराठीत जाणणे हा धातु आला आहे. म्हणून जाणणे याचा अर्थ ज्ञानप्राप्ती करणे होय. ज्ञानप्राप्ती करणे म्हणजे केवळ पुस्तके वाचणे आहे का ? आज जरी आम्ही   पुस्तके वाचून ज्ञानी होण्याचा सवंग मार्ग शोधून काढला असला तरी वैदिक परंपरा असल्या बहुवाचकाला बहुशृत म्हणते , ज्ञानी म्हणत नाही. ज्ञानप्राप्ती साधनेने होते , ज्ञानप्राप्ती तपस्येने होते , ज्ञानप्राप्ती योगसंसिध्द आहे. भगवंत गीतेत म्हणतात , ' न हि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । तत्स्वयं योगसंसिध्दः कालेनात्मनि विंदति ' ॥ श्लोक ३८ अ. ४ ॥ उपनिषदेही असेच सांगता...