पोस्ट्स

जून, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चमत्कार

प्रश्न क्र. 50 :- काकाजी, योगीजन जे अनेक प्रकारचे चमत्कार करतात. (उदा. हातातून रक्षा काढणे वगैरे) यात कितपत तथ्य आहे? आपण असे प्रकार करता का किंवा याअगोदर करीत होतात का ? (योगीराज मनोहरजी हरकरे यांना एका साधकाने आपल्या मनातील विचारलेला प्रश्न व त्याला पूज्य काकाजींनी दिलेलं रोखठोक व वैज्ञानिक संदर्भ देऊन आणि आध्यत्मिक दाखला देवून दिलेले उत्तर.)   'चमत्कार' हा शब्द च+मत+कार या उप-शब्दांनी बनलेला शब्द ! यातील 'च' हा वर्ण विशेषतः 'विश्वास' दर्शवितो. 'मत' म्हणजे मत (इंग्रजीत opinion) आणि 'कार' हा शब्द केलेल्या कर्मानुसार आलेली अनुभूति दर्शवितो. अर्थात् चमत्कार म्हणजे साधकाच्या कर्मानुसार आलेल्या सत्य अनुभूतींवर दृढ विश्वासाने मांडलेले मत होय. या दृष्टीने साधनेत एकाला जे अनुभव येतील तसलेच अनुभव दुसऱ्या साधकाला त्याच मार्गाने गेला तर यायलाच हवेत. विज्ञानात योग्य प्रमाणात हैड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने पाणी तयार होते, पण त्या प्रयोगात जर थोडी जरी चुक झाली तर हैड्रोजन पैराऑक्साईड तयार होईल. हे प्रयोगांती सिद्ध झालेले मत आहे. त्याचे मत हेच खरे ...

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - साधक अबोल आणि अलिप्त

प्रश्न क्र. 49 :- साधक जितकी अधिक साधना करत असतो, तितका तो अधीर अबोल आणि अलिप्त होत जातो. असे कां ? साधनेची ही मधली अवस्था आहे. साधकाला साधनेत काही टप्पे पार करावे लागतात. प्रवासात निघतांना मधे-मधे काही गावं, खेडी, शहरे, लागतात. आपण ते ओलांडून पुढील प्रवासाला निघतो आणि अंतिम स्थळी पोहचतो. तद्वत साधनेतील काही टप्पे पार करावे लागतात. तेव्हा अंतिम साध्य मिळते. मुळात योग्य गुरूंकडून आपल्या योग्यतेची साधना मिळणं हेच अहंभाग्य होय. प्रथमतः साधना करतांना कशात लक्ष लागत नाही, साधना करण्याची धडपड सुरू होते. प्रयत्न करीत-करीत कुठेतरी धागा सापडतो. ही सुरुवातीची अवस्था होय. साधनेत साधकाच्या मनाची एकाग्रता हा साधनेचा पहिला टप्पा. हळूहळू साधना वाढवतं असता बाहेर लक्ष जात नाही. नंतर रंग, आवाज, नाद यांच्या अनुभूति येतात. दिव्याचा प्रकाश सर्वत्र पसरतो. पण टॉर्च स्वतः अंधारात राहून सर्व प्रकाश एकत्रित करतो. त्याप्रमाणे साधनेने सारी शक्ती ध्यानात एकवटली जाते. इच्छा असली तरी अन्य काही करण्यास शक्ती उरत नाही. कुणाशी बोलावसं वाटत नाही. अगदी एकांत व अलिप्तपणे राहावेसे वाटते. ही मधली अवस्था साधक अनुभवत असतो...

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - योगनिद्रा

प्रश्न क्र. 48 :- योगनिद्रा म्हणजे काय व ती कशी करावी ? योगनिद्रेने कोणते लाभ होतात ?   योगनिद्रा म्हणजे योग्याची निद्रा. योगनिद्रा करतांना अवयव ध्यान केले जाते. आपल्या शरीरामध्ये बरेच अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवावर ध्यान केंद्रित करुन व नंतर त्यावरुन ध्यान काढून दुसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रित करणे, परत त्यावरुन ध्यान काढून तिसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रित करणे. या प्रमाणे प्रथम उजव्या पायाचे सर्व अवयव नंतर डाव्या पायाचे सर्व अवयव, त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्या पासून खांद्यापर्यंतचे सर्व अवयव, तसेच डाव्या हाताचे सर्व अवयव, त्यानंतर मुख्य शरीराचे (धडाचे) सर्व अवयवांवर एकानंतर दूसरा अवयव असे ध्यान करुन शेवटी 'सहस्रार' चक्रावर म्हणजेच मस्तकाच्या मधोमध ध्यान केंद्रीत करुन त्यामध्येच ध्यानमग्न होऊन जायचे आहे. या प्रमाणे अवयव ध्यान करुन साधक अशा निद्रेत जातो की जिथे साधकाचे शरीर झोपलेले असते परंतु साधकाचा जीवात्मा सदैव जागृत आणि सतर्क असतो. यालाच 'योगनिद्रा' असे म्हणतात. योगनिद्रेसाठी आसन अवयव ध्यान करण्याकरता प्रथम जमिनीवर सतरंजी टाकून त्यावर पांढरे स्वच्छ धूत वस्त...