वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चमत्कार
प्रश्न क्र. 50 :- काकाजी, योगीजन जे अनेक प्रकारचे चमत्कार करतात. (उदा. हातातून रक्षा काढणे वगैरे) यात कितपत तथ्य आहे? आपण असे प्रकार करता का किंवा याअगोदर करीत होतात का ?
(योगीराज मनोहरजी हरकरे यांना एका साधकाने आपल्या मनातील विचारलेला प्रश्न व त्याला पूज्य काकाजींनी दिलेलं रोखठोक व वैज्ञानिक संदर्भ देऊन आणि आध्यत्मिक दाखला देवून दिलेले उत्तर.)
'चमत्कार' हा शब्द च+मत+कार या उप-शब्दांनी बनलेला शब्द ! यातील 'च' हा वर्ण विशेषतः 'विश्वास' दर्शवितो. 'मत' म्हणजे मत (इंग्रजीत opinion) आणि 'कार' हा शब्द केलेल्या कर्मानुसार आलेली अनुभूति दर्शवितो. अर्थात् चमत्कार म्हणजे साधकाच्या कर्मानुसार आलेल्या सत्य अनुभूतींवर दृढ विश्वासाने मांडलेले मत होय. या दृष्टीने साधनेत एकाला जे अनुभव येतील तसलेच अनुभव दुसऱ्या साधकाला त्याच मार्गाने गेला तर यायलाच हवेत. विज्ञानात योग्य प्रमाणात हैड्रोजन व ऑक्सिजन यांच्या संयोगाने पाणी तयार होते, पण त्या प्रयोगात जर थोडी जरी चुक झाली तर हैड्रोजन पैराऑक्साईड तयार होईल. हे प्रयोगांती सिद्ध झालेले मत आहे. त्याचे मत हेच खरे म्हणजे मनाची निष्ठा दृढ ठेवणे, याला चमत्कार म्हणतात. विभूति वगैरे काढणे हा केवळ भ्रम, अहंकार असतो. दर क्षणाला परमेश्वर किती चमत्कार करतो. परमेश्वर शून्यातून विश्व निर्माण करतो, हाही चमत्कारच आहे. खरे योगी चमत्कार दाखवीत नाहीत. त्यांच्या मनाच्या विवक्षित अवस्थेमुळे लोकांना तसे अनुभव येतात. इंद्रधनुष्य कायम दिसत नाही. एका विशिष्ट कोनातच ते दिसते. सूर्य प्रकाशतो - प्रकाश देत नाही.
महापुरुषांच्या संगतीमध्ये उच्च अवस्थेमध्ये अनुभव येतात. योगी मनोहरांना एकदा एकाने विचारले की, "काकाजी ! तुम्ही हे चमत्कार कसे केले ?" त्यांनी उत्तर दिले, "मी काही केले नाही. ज्ञानेश्वर माउलीने ते माझ्याकडून करवून घेतले." विभूती काढणे वगैरे हातचलाखीचे प्रकार आहे, भास आहे. चमत्काराच्या मागे लागू नये. खरा साधक साधनेचे अंग झाकून ठेवतो.
मी पूर्वी मिठाई वगैरे काढत होतो पण ती दुसऱ्याच्या हातात निघत होती. पण ही पिशाच साधना आहे, हे कळल्या- वर हे प्रयोग बंद केले. पिशाच साधना करणारा मेल्यावर पिशाच योनीत जातो.
परमेश्वर चमत्कारांपासून करोडो कोसो दूर आहे. चमत्कार दाखवून व्यवहार सोडायला लावणे योग्य नाही. चमत्काराने विभूती काढायची. मग हजारो भाकऱ्या काढल्या तर भूकेल्यांची भूक तरी भागेल, पण ते नाही ना काढता येत. म्हणून खोट्या प्रतिष्ठेच्या मागे लागू नये.
संदर्भ :- योगीराज मनोहर हरकरे व साधकांतील प्रश्नोत्तराच्या संवादातील एक प्रश्न
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://vaidik-vishwa.blogspot.com/
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा