वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा- महाभारत व रामायण यामधील युध्द
प्रश्न क्र. 15 :- महाभारत व रामायण यामधील युध्दातील अस्त्रांचा खरा अर्थ काय ?
महाभारत आणि रामायण युध्दात बरीचशी अस्त्रे एकमेकांच्या सैन्याच्या संहारा करण्याकरीता वापरली गेली. ही सर्व अस्त्रे म्हणजे ॲटम बॉम्ब आणि न्यूट्रॉन बॉम्ब सारखी भयंकर संहारास्त्रे असावीत असे मानतात किंवा तसा समज आहे. परंतु रामायण महाभारत हे निखळ अध्यात्मिक ग्रंथ असल्यामुळे त्यात आध्यात्मिक साधनेची रहस्ये समजून घेणे आवश्यक आहे. 'अस्त्र' या शब्दाची बीजाक्षरे पाहिली तर 'अस्' म्हणजे असणे आणि 'त्र' म्हणजे रक्षण करणे. म्हणून अस्त्र या शब्दावरून असलेल्या अवस्थेचे रक्षण होणे असाच निघतो. आता काही अस्त्रे पाहू. तसेच त्यातील आध्यात्मिक आशयही शोधू.
महाभारत वा रामायणातील सर्व अस्त्रांचा खरा आशय आपण समजतो त्यापेक्षा भिन्न आहे. अस्त्र याचा अर्थ संहार नसून त्या अवस्थेचे रक्षण करणे होय. ब्रह्मास्त्र म्हणजे ब्रह्ममय अवस्थेच रक्षण करणं होय. अग्न्यास्त्र म्हणजे अग्नितत्व वा तेजस तत्वाच्या साधनेचे सातत्य होय, वायवास्त्र म्हणजे वायुतत्व वा प्राणाचे रक्षण करणारी अवस्था तर पर्जन्यास्त्र म्हणजे पर्जन्य वा आपतत्व (जलतत्व) अवस्थेचं साधकांत अधिक काळ सातत्य ठेवणे होय. सर्व साधारण कल्पना अशी आहे कि युध्दात या अस्त्रांचे प्रयोग केल्याने सर्वनाश (ब्रह्मास्त्र), वायवास्त्र म्हणजे वायुचा प्रकोप, अग्न्यास्त्र म्हणजे अग्नीचे तांडव एवं पर्जन्यास्त्र म्हणजे पावसाचं नग्न नर्तन होय. परंतु हा त्याचा खरा अर्थ नाही. मध्यंतरीचे कालांत विद्वानांनी योग मार्गाच्या दिशेने पाठ फिरविल्यामुळे त्यांना त्या महान शास्त्रातील रहस्य कळणे कठीण झाले आणि मग त्यांचे पढत बुध्दीला जे वाटले तसा त्यांनी त्यांचा अर्थ लावला. अस्त्र म्हणजे रक्षण करणे होय, विध्वंस नव्हे. सर्व अस्त्रांचा अर्थ आध्यात्मिक, यौगिक आहे. भौतिक घटनांचा नाही हे लक्षांत ठेवणे आवश्यक आहे.
ब्रह्मास्त्र म्हणजे सर्व वस्तुजात नष्ट करून त्यापलीकडील चिरंतन ब्रह्मपद देणारी अक्षय गति ! मग ती सर्वच नष्ट करणारी उलट गति राहणार नाही काय? संत मीराबाई त्या ब्रह्मास्त्राचे आपल्या भाषेत वर्णन करते, "उलट भई मोरी नयनन की । मोरी लागी लटक गुरु चरनन की ॥" त्या अक्षय ब्रह्मगतीला गेल्यावर या जडसंसाराकरता कोणी शिल्लक राहत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, 'तुका म्हणे न ये परते तुझ्या दर्शने मागुते |' भगवद्गीता त्या ब्रह्मास्त्राचे वर्णन करते, 'यद्गत्वा न निवर्तंते तध्दाम परमं मम ।' तेथे गेल्यावर मग कोणी परत येत नाही. सर्वस्वाचा होम म्हणजे ब्रह्मास्त्र होय.
संदर्भ :- जन्म-मृत्यू रहस्य - योगी मनोहर
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा