वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - मनाची एकाग्रता

प्रश्न क्र. 17 :- मनाची एकाग्रता कशी साध्य करावी ?

कोणतेही काम करायला मनाची एकाग्रता लागते. मनाची एकाग्रता नसेल तर साधं व्यवहारिक काम सुद्धा व्यवस्थित होत नाही. त्यासाठी प्रथमतः आपणांस मनाची एकाग्रता भंग होण्याची कारण मीमांसा करावी लागते. योग्य कारण सापडल्यास मनाची एकाग्रता मिळवता येते. ते सातत्याने टिकवता येते.

आपले मन ध्यानाद्वारे एकाग्र करून ऋषि अध्यात्मिक चिंतन करीत आणि त्याद्वारे ज्ञानविज्ञानांतील गहन तत्वे समाजासमोर ठेवित असत. वेदामध्ये बरेच ज्ञानविज्ञान साठविले आहे. परंतु दुर्दैवाने आज वेद म्हणजे केवळ मंत्र मानले जातात. वेदातील सर्व ज्ञानविज्ञान ऋषींनी सखोल चिंतनाद्वारेच प्राप्त केले. आजचे थोर वैज्ञानिक सुद्धा तसल्या सखोल चिंतनाचा उपयोग करून नवनवे शोध लावतात आणि मानवी जीवन सुखी समृद्ध करण्याचा अहोरात्र प्रयत्न करतात. वैज्ञानिकांच्या मनाची एकाग्रता त्यांचे त्या विषयाच्या आवडीतून आणि धुंदीतून उत्पन्न होत असते. असली एकाग्रता अथवा चिंतनाची क्षमता सर्वातच जन्मतः असू शकत नाही. त्याकरिता आसन, प्राणायाम, प्रत्याहार, ध्यान, धारणा इत्यादी मार्गाने आपण आपल्या मनाची एकाग्रता सखोल चिंतनाची क्षमता वाढवू शकतो. योगसाधन एक प्रकारचे प्रशिक्षण आहे. आजकाल जीवनाच्या प्रत्येक कक्षेत प्रशिक्षणाचे महत्त्व वाढत आहे. मनाच्या एकाग्रतेची सखोल चिंतनाची गुरू-किल्ली ध्यान प्रक्रियेत आहे. ध्यानामुळे मन अतिशय एकाग्र बनत असते. असल्या एकाग्र मनाचा उपयोग आपण आपल्या जीवनातील कोणत्याही कामाकरिता करून त्यात लवकर उन्नती पूर्णता प्राप्त करु शकतो.

 एखादे कामात लक्ष लागत नसेल तर, "ध्यान कुठे आहे" असे सहज बोलले जाते. एवढ्या सहजतेनं आपल्या आयुष्यात ध्यान प्रक्रिया यायला पाहिजे. त्यासाठी पूज्य काकाजींनी सुलभ योग साधनेत दीपक त्राटक, ओम् कार षट्चक्र भेदन, अवयव ध्यान योगनिद्रा सारख्या अत्यंत प्रभावी साधना सांगितल्या आहेत. त्यांचा आपल्या रोजच्या जीवनात अवलंब करून, मनाची एकाग्रता साधण्यासाठी आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकतो. जगतगुरु संत तुकाराम महाराज म्हणतात. "तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे "

संदर्भ :- वैदिक विश्व परिकल्पना - योगीराज मनोहर हरकरे

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी