वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - साधना सातत्य

 प्रश्न क्र. 26 :- साधना करतांना सातत्य राहात नाही ? मध्येच खंड पडतो, काही काळानंतर पुन्हा साधना कराविशी वाटते. अशावेळी काय करावे सुचत नाही ? यांवर उपाय काय ?

 खरं आहे ! साधना करतांना सातत्य राहत नाही. खंड पडतो, सुचत नाही. काय होते आहे ते कळत नाही. मनात अनेक शंका येतात. काहूर माजतो. साधनेत खंड पडल्यानंतर सुरवात कशी करावी असा प्रश्न पडतो. पुन्हा नव्याने सुरवात करावी, की जेथून खंड पडला तेथून साधना सुरू करावी??? असे अनेक प्रश्न आपल्या समोर उभे राहतात.

 आपण प्रापंचिक, स्त्री असो वा पुरुष यात भेद नाही, कुटुंबात राहून, कौटुंबिक, शैक्षणिक, सामाजिक, अर्थार्जन करणे या सारख्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडतो. किंबहुना त्याला अधिक महत्व दिले जाते. त्या-त्या वयात ते आवश्यक असते. आपले कर्तव्ये पार पाडली पाहिजे. त्याच बरोबर आध्यात्मिकता सुद्धा साधता येणे तेवढेच महत्वाचे आहे. प्रपंच होतो, परमार्थ व्हावा, अद्वैत भाव आला पाहिजे.

 आपल्याकडे अध्यात्म्या विषयी असा गैरसमज पसरला आहे की अध्यात्म वगैरे हे सर्व उतार वयात करायच्या गोष्टी आहेत. आणि हा समज तसाच पुढे पसरवल्या जात आहे. पण खरं तर अध्यात्मिक साधना करण्यासाठी पुरेसा वेळ, मनोबल शक्ती आवश्यक असते. यासाठी तरुणांना पुढे येणे आवश्यक आहे. ह्या वयात त्यांचेकडे शारीरिक शक्ती आणि मनोबल असते. योग्य मार्गदर्शन मिळाले तर त्या साठी ते वेळही देऊ करतील. पण काही संधी साधू, ढोंगी पढडीबाज बुवांमुळे अध्यात्माचा सामाजिक स्तर घसरत चालला आहे. तरुणाई इकडे तिकडे भरकटत आहे. आणि एकाच्या अनुभवातून इतरांचे नुकसान होते. म्हणून अध्यात्मिकतेकडे तरुण यायला धजत नाही. खरे अध्यात्म साधक शरीर मन यांनी तरुण असल्या शिवाय साध्य होत नाही.

 साधनेसाठी उत्तम शरीर, सात्विक मन, प्रखर बुद्धी शुद्ध चित्त असायला हवे. त्यासाठी प्रयत्नशील झाले पाहिजे. साधना करणे गरजेचे आहे. मग ती कुठूनही सुरवात केली तरी चालते. आपणास आवडतो असा मार्ग निवडून आपले मन, चित्त, बुद्धी शरीर तिकडे लावावे. सर्व शंका , झालेला गोंधळ सर्वस्व आपले गुरूवर सोडून सांगितलेले साधन करावे निश्चिंत व्हावे. सोपा मार्ग आहे. समर्थ रामदास म्हणतात की 'मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥'

*संदर्भ :- पूज्य काकाजींच्या व्याखानांतील समालोचन*                                           

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी