वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - शुक ऋषी / पोपटाचे शिर
प्रश्न क्र. 32 :- शुक ऋषी यांना पोपटाचे शिर दाखवतात. ह्यामागे काय आशय असावा ?
विचार विनिमय आणि समाधान ः
विषय सुरू करण्यापूर्वी ज्यांनी 'भागवत' पुराण लिहिले त्या भगवान वेदव्यासांना अभिवादन करतो. त्यांच्या नामाभिधाना- तील आशय सांंगणे अगत्याचे वाटते म्हणून हा आशय प्रकट करीत आहे. भूमिती शास्त्रात व्यास म्हणजे वर्तुळातील वर्तुळ-मध्यातून जाणारी नि परीघाच्या दोन्ही अंगांना मिळणारी सरळ रेषा म्हणजे 'व्यास'(Diameter) ही व्याख्या केलेली आहे. संसाररुपी वर्तुळावर आपण सारे भ्रमण करीत असतो. यातील एखादा ज्ञान प्राप्त करायला वर्तुळ-मध्यात जावून आणि ज्ञान प्राप्त करून ते ज्ञान स्वतः जवळ न ठेवता सर्व जगाला देण्यासाठी पुनः संसार रुपी वर्तुळ परीघावर येतो. हा एखादा अर्थात भगवान 'वेदव्यास' होय. ही परिभाषा योगी मनोहरांनी साधकांना सांगितली आहे. हा व्यास आशय सांगणाऱ्या योगी मनोहरांना (पूज्य काकाजींना) वंदन करुन आपण प्रस्तुत विषयावर येवू.
'शुक' मुनी हे भगवान व्यासांचे' पुत्र ! एकदा स्वर्गातील एक 'घृताची' नामक अप्सरा 'शुकीचे' रुपात भ्रमण करीत होती. 'शुकी' म्हणजे पोपटाची मादी होय. व्यास मुनी आणि घृताची ही दोघे परस्पर सहवासात आली. यांच्या सहवासामुळे व्यासांना घृताची पासून पुत्र रत्न झाले. पृथ्वीवरील भ्रमण 'शुकीच्या रुपात' असल्याने पुत्राचे नाव 'शुक' ठेवण्यात आले. यामुळे शुक मुनीचे शिर पोपटाचे दाखवले जाते.
पक्षांमध्ये शुक असा पक्षी आहे की त्याचेवर मनुष्याने संस्कार केल्यास तो त्यास शिकविल्याप्रमाणे बोलू शकतो. सृष्टीतील हा एक चमत्कार समजावा. परमेश्वराने मानवाला विचार करायला डोक्यात मेंदू दिल्याने त्याला महत्ता द्यायच्या उद्देशाने पक्षी रुपी शुकाचे शिर डोक्यावर दर्शविले असले पाहिजे.
दुसरे असे की व्यास विशाल बुद्धिमत्तेचे असल्यानेच त्यांनी सर्व सामान्यांसाठी अठरा पुराणांची रचना केली. याकरिता त्यांनी उच्च उच्चतम साधना केल्यात. या साधनांकरिता अनुकूल शरीरही संपन्न केल. असली संपन्न शरीररुप काया म्हणजे त्यांची स्त्री अर्थात अप्सरा 'घृताची' होय. साधना केल्यावर साधनेचे फल मिळणार. आणि हे प्राप्त साधना फल म्हणजे पुत्र 'शुक' मुनी होय.
ज्ञानी व विरक्त अशा शुक मुनींनी महाराज परिक्षितांना मृत्युपूर्वी धर्मोपदेश केला.
सांबशिवार्पणमस्तु !
-- अभिराम
संदर्भ :- पूज्य काकाजींच्या भागवत कथा मधील संदर्भातील आशय
शब्दांकन :- रमेश हुगेवार
मो.क्र. 9960149561
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा