वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - गुरुकृपा

 प्रश्न क्र. 10 :- माझा एक प्रश्न आहे गुरुकृपा होण्यासाठी काय करावे ?

अध्यात्मिक क्षेत्रांमध्ये सर्वात जास्त साधकांना असलेला प्रश्न गुरु संदर्भात आहे. अनादिकालापासून चालत आलेली ही गुरू-शिष्य परंपरा असून सुद्धा गुरु विषयी असंख्य प्रश्न उपस्थित होतात. याला जबाबदार हा सामाजिक स्तर आहे. थोडीशी साधना करून काही मिळवले की आजकाल कोणीही व्यक्ती पुढे येते आणि आपल्या नावाचा संप्रदाय निर्माण करते. ते स्वतःला गुरू म्हणून, थोडेफार लोक जमा करून, त्यांचे करवी इतर लोकांना आकर्षित करून मोठं साम्राज्य स्थापित करतात. आंधळेपणाने लोक सुद्धा त्या मागे जातात. त्यांच्यात सामील होतात. आशा तऱ्हेने तो सांप्रदाय फोफावत जातो. नावारूपाला येतो. खूप गाजावाजा होतो. पण तो फक्त क्षणभंगुर असतो. ह्याने कुणाचं भलं होत नाही आणि कोणतीही गुरुकृपा होत नाही. आपणच स्वतःची फसगत करत असतो. समाज यातच गुरफटला जातो. खऱ्या ज्ञानापासून वंचित राहतो. म्हणूनच अशा तथाकथित गुरू, महाराज, बुवा, बाबांची चलती वाढली आहे. त्यामुळे समाजाचा अध्यात्मिक ऱ्हास होत आहे.

वैदिक परंपरेनुसार जर आपण खरे ज्ञानोपासक असाल तर ह्यांच्या मागे जाता योग्य वेळेची वाट पहा. आपले आचार, विचार, सत्य, अहिंसा, परमेश्वराप्रती श्रध्दा, भक्तीभाव, विश्वास ठेवून जीवन जगणे हे गुरुकृपा होण्यास कारणीभूत होतात. आपण गुरू शोधण्याच्या मागे लागू नये."ठेविले अनंते तैसेचि रहावे l चित्ती असो द्यावे समाधान l" या सारख्या संतांच्या वचनाप्रमाणे जीवन जगत राहिल्यास गुरुकृपा झाले शिवाय राहत नाही. योग्यवेळी गुरू स्वतःहून शिष्याचा शोध घेत येतात. येथे मात्र शिष्याची तेवढी तितीक्षा असावी लागते. योग्य गुरु लाभला की साधकाच्या पात्रतेनुसार गुरुकृपाही होते. वेगळं काही करण्याची गरज नसते.

गुरू मध्ये सद्गुरू मिळणे हीच गुरुकृपा आणि गुरूकृपेने गुरुवर निष्ठा असणे हीच सद्गुरूकृपा ! असा ज्याचा अटळ विश्वास असतो त्यावरच सद्गुरूकृपा होते.

संदर्भ :- पूज्य काकाजींच्या गुरू-शिष्याच्या गोष्टीतील शंका समाधान

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी