वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - सुखी जीवनासाठी

प्रश्न क्र. 29 :- सुखी मानवी जीवनासाठी काय आवश्यक आहे ?

अनादी काळापासून मानव सुखी होण्यासाठी धडपडतोय. अगदी आपल्या ऋषी-मुनी पासून ते आजच्या विज्ञानाच्या संशोधना पर्यंत मानव सुखासाठी निरनिराळे संशोधन करून मानवास सुख कसे प्राप्त होईल याचा सतत प्रयत्न झाला आहे, होत आहे. तरी पण अजून मानव सुखी झाला की नाही हा संशोधनाचा विषय ठरतो. कारण कालानुरूप मानवांची सुखाची परिभाषा बदलत गेली. सुख अर्थात 'सु' म्हणजे उत्तम आणि 'खं' म्हणजे आकाश. याचा अर्थ असा की जे उत्तम उच्च आकाशतत्व आहे ते साधने द्वारे प्राप्त करतो ते परम सुख होय. पण मानव क्षणिक सुखामागे धावत सुटला. खऱ्या आत्मिक सुख-शांती पासून लांब होत गेला. याचा अर्थ असा की भौतिक जगात सुख नाही. म्हणून सुखी मानवी जीवनासाठी काय आवश्यक आहे असा प्रश्न साहजिकच पडतो. यावर समाधान बघू.

 मानवी जीवनाची रचना शास्त्रीय आधारावर करून संपूर्ण मानवजीवन ज्ञानमय करणे याला 'वैदिक जीवन' अर्थात् 'वैदिकता' असे म्हणतात. 'विद्' म्हणजे ज्ञान प्राप्त करणे 'वैदिक' म्हणजे प्राप्त ज्ञानानुसार जीवन यापन करणे. केवळ पुस्तके वाचून, प्रवचने किंवा व्याख्याने ऐकून आणि आचाराशिवाय केवळ विचार ठेवून नव्हे तर सुयोग्य साधना करुन तद्नुसार आचरणामुळे ज्ञान प्राप्त होत असते. असा विचार तद्नुसार आचरण करून मानव सुखी होत आहे. सर्व महापुरुषांनी ज्ञानमय जीवन जगून त्याप्रमाणे सामाजिक शिकवण दिली आहे. ती आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मानव सुख अनुभवू शकतो. सुखी होऊ शकतो.

भौतिक अथवा जड जगताबद्दलच्या ज्ञानाला विज्ञान म्हणतात तर सुयोग्य चिंतन आणि अध्यात्मिक साधनांद्वारे जी अनुभूती प्राप्त होते त्याला ज्ञान म्हणतात. सुखी मानवी जीवनासाठी ज्ञान आणि विज्ञान दोन्ही आवश्यक आहेत. याकरिता आपल्या दैनंदिन जीवनात वैदिक साधना करणे आवश्यक आहे. जसे शरीर, मन स्वास्थ्यासाठी योगासने प्राणायाम करतो. तसे आत्मिक उन्नतीसाठी ध्यान साधना आवश्यक आहे. भक्तिमार्गात नामस्मरणास खूप महत्व आहे, तर योगमार्गातील दीपक त्राटक, ओंकार षट्चक्र भेदन (ध्यान-प्रक्रिया), अवयव ध्यान म्हणजे योगनिद्रा करून जीवन समृध्द करायचे नित खऱ्या आत्मिक शांतीचा अनुभव घ्यायचा ! मानवी हित सुख खरे तर यातच सामावलेले आहे !   

            

*संदर्भ :-  वैदिक विश्व परिकल्पना - योगी मनोहर*    

                     

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

 

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी