वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - संसारात राहून योगसाधना

प्रश्न क्र. 22 :- संसारात राहून योगसाधना करून दिव्यत्वाची प्रचीती येण्यासाठी संसाराचा त्याग करायला हवा कां ?

साधनेच्या मदतीने वरची अवस्था प्राप्त करणे यास 'योगसाधना' म्हणतात. हे आपणास माहीतच आहे. आणि शास्र संसारा बाबत सांगते की "संसरति इति संसारः" जे सरकते म्हणजे गतिशील व परिवर्तित असते त्यास संसार म्हणतात. वेग व बदल यावर आरूढ होवून, कुवृत्तींचा त्याग करत-करत शांत होत जाऊन साधनेत प्रगतीपथावर असणे आणि दिव्यत्वाची प्रचीती घेणे हाच खरा पुरुषार्थ होय.

वैदिक काळातील ऋषीमुनींनी संसार मांडून ध्यान धारणा करत, जे ज्ञान प्राप्त केले ते ज्ञान समाजाला देवू केले. याचा विसर पडता कामा नये. बरेचसे संत संसारी होते. आणि होते नव्हते त्या सर्वंच संतांनी सुद्धा संसाराची महती सांगितली आहे. समर्थ दासबोधात म्हणतात. "दृढ निश्चयो धरावा। संसार सुखाचा करावा ।" ती ईश्वरी अवस्था गाठण्यासाठी दृढ निश्चय करून हा संसार सुखाचा करावा. माऊली सुद्धा सांगतात. "अवघाचि संसार सुखाचा करीन । आनंदें भरीन तिन्ही लोक ।।" अशाप्रकारे सर्वच संतांची एक वाक्यता दिसून येते. समर्थ रामदास व माऊली ज्ञानेश्वर यांनी कोणता संसार केला ? संसारात राहून प्रपंच करून परमार्थ साधावा. हीच ती शिकवण आपल्या पूर्वजनांनी दिली आहे. संसार त्याग ही कल्पना मुळामध्ये मान्य नाही. प्रपंचाचा त्याग म्हणजे बायका-पोरे यांचा त्याग नव्हे. तर हे सगळे सांभाळून प्रपंच करायचा. पण कोणता? प्रपंच म्हणजे पाचांसह (पंचमहाभूतांसह) पुढे मार्गक्रमण करणे होय.

 याचे मूर्त स्वरूप म्हणजे स्वतःचे शरीर. स्वतःच्या शरीराचा त्याग कसा करता येईल ? जबाबदारी स्वीकारून, अनासक्त राहून, मायेत गुंतून न राहता आपलं कर्तव्य चोख बजावून मग आपली साधना करावी. अशा प्रकारे त्याग न करताही कार्यक्षमता वाढवता येते. साधकाची बुद्धी अधिक कार्यक्षम होते. कोणत्या प्रपंचाचा त्याग करणार ! त्याला घेऊन उच्च अवस्थेला जायचे. यथोचित कालावधी नंतर त्या दिव्यत्वाची प्रचिती येते. पण योगसाधना प्रामाणिक असावी लागते. याकरता तेवढया उच्च क्षमतेच्या गुरूचा आशीर्वादही त्यास असावा लागतो.        

संदर्भ :- पूज्य काकाजींच्या गुरू-शिष्याच्या गोष्टीतील शंका समाधान                           

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी