वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - यम-नियमांचे पालन

प्रश्न क्र. 25 :- आजकाल सगळीकडे सामाजिक नीतीचा ऱ्हास होत आहे व नीती अनीतीचे संदर्भच विवादास्पद ठरत आहेत. अशा परिस्थितीत अगदी ठरवून सुद्धा दैनंदिन व्यवहारात यम-नियमांचे पालन करणे अवघड होऊन जाते. योगमार्गातील ही पहिलीच पायरी जर सहज पार पाडता येत नसेल तर पुढील पायऱ्या कशा पार पाडायच्या ?

(दैनंदिन व्यवहारात बहुतांश साधकांना असलेला हा प्रश्न आजच्या २५ भागा निमित्ताने आठवला. सर्वांच्या मनातील हा प्रश्न होय. पूज्य काकाजींना एका शिबिरात एका साधकाने विचारलेल्या ह्या प्रश्नाचे उत्तर आपण बघू.)

पूज्य काकाजींच्याच शब्दात !

सध्याच्या काळात कठीण आहे. पण प्रयत्न करणे. आध्यात्मिक नियमानुसार दुसऱ्यांकडे जेवलो तर त्यांच्या विचारांचा परिणाम आपल्या मनावर होतो. पण मला दुसऱ्याकडे जेवावे लागते. त्या अन्नाचा आपल्या मनावर परिणाम होऊ नये. म्हणून मनावर योग्य संस्कार करतो. जेवढे आपल्या अधीन असेल तेवढे करावे. पण विपरित होऊ नये, याची काळजी घ्यावी.

(अगदी मोजक्या शब्दांत उच्च कोटींचे आध्यात्मिक तत्व ज्ञान, स्वानुभवातून सूक्ष्म मनावर होणारे संस्कार, सध्याच्या काळात घ्यावयाची काळजी व स्वाधीनतेचा हा संदेश वहन करणाऱ्या परमपूज्य विश्वयोगी काकाजींना शतशः वंदन ! हरी ओम् तत्सत् !!)

संदर्भ :- काकाजींच्या सहवासातील दिव्यक्षण                                 

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी