वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - उत्तम साधक / श्रीराम जन्म

 प्रत्येक साधकाच्या मनात काहीतरी अध्यात्मिक प्रश्न असतातच. काहीवेळेस त्यांची उत्तर सापडतातच असे नाही. अशा अनुत्तरित प्रश्नांनी आपल्या साधना जीवनात काहीशा अडकाठी येऊ शकतात. त्यातून मार्ग सापडत नाही. "एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" या उक्तीप्रमाणे एक एक प्रश्नचिन्ह सोडवत आपणा सर्वांना पुढे जायचे आहे.

 प्रश्न क्र. 1 :- उत्तम साधक होण्यासाठी काय करावे ?

  उत्तर :- गुरूवर अढळ निष्ठा ठेवावी.

 उत्तर सोपे असते पण आचरणात आणणेसाठी गुरुचीच कृपा व्हावी लागते. यातून पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की "गुरुकृपा होणेसाठी काय करावे ?" या भूतलावर असा कुणी नसेल की त्याला काही प्रश्न नाही.

प्रश्न क्र. 2 :- श्रीराम जन्म त्यांचे आदर्श चरित्र आणि साधना जीवनातील अनुभूती यांचा संबंध आहे का ?

 चैत्र शुक्ल नवमीला श्रीराम जन्म म्हणजेच रामनवमी आपण साजरी करतो. सहस्रावधी वर्षे झाली तरी तो आम्ही पाळतो आहोत. रामाचा आदर्श जगाला मान्य आहे. आज पुन्हा जगाला रामासारख्या आदर्श चरित्राची आवश्यकता आहे. त्यासाठी साधनेशिवाय पर्याय नाही. साधना जीवनाच्या कालात येणाऱ्या अनुभवाचे वर्णन, गुह्य अर्थाने कथारुपचरित्र ऋषी वाल्मिकींनी लिहलेल्या रामायण ग्रंथात आहे. त्याचा आपल्या जीवनात व साधनकालात बहुमूल्य आदर्शवत व मार्गदर्शक आहेच.

 चैत्र प्रतिपदेला पिंडातील घटात ज्याची स्थापना केली तो रामनवमीच्या दिवशी ऐन माध्यान्याचे वेळी जन्माला येतो. घटाघटांना आनंद देणारी राम शक्ती अवस्था रामाचे श्यामल रूपानें पृथ्वीवर अवतीर्ण होते. याच रामाने भूमीतून म्हणजे पृथ्वी तत्त्वातून वर आलेल्या सीतेचे स्वयंवररूपाने लग्न केले स्वयंवराकरता श्रीरामाने ज्या शिव धनुष्याचा भंग केला, ते शिवधनुष्य म्हणजे साधकाचा मेरुदंड होय. ते शिवधनुष्य दोन ठिकाणी भंग पावून त्याचे तीन तुकडे झाले होते. अतिशय उच्च अशा योग साधकांना शिवधनुष्याच्या या तीन तुकड्यांचा अनुभव येत असतो. हे काही काल्पनिक नसून खऱ्या साधकाला या अतिउच्च अवस्थेचा अनुभव हा येतोच. आपल्यातील आत्माराम दिसून येतो. म्हणून रामायणकार “रमयते इति रामः !” असे नामोल्लेख करतात.

याच सारखे कथारूपवर्णन संपूर्ण रामायणात आहे. या दृष्टीने विचार करून ते आपल्या आयुष्यात व साधनेतील अनुभूतीच्या संबंधित आहे.

संदर्भ :- वैदिक संणाचे योग रहस्य - योगी मनोहर

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा. धन्यवाद !

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

 

 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी