वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा- हनुमान / सूर्य
प्रश्न क्र. 7 :- हनुमान जन्मजात सूर्याला खाण्यासाठी उड्डाण करतो हे कसे शक्य आहे ?
भौतिक व वैज्ञानिक दृष्टीने बघितले तर हे अशक्य वाटते, पण हनुमान जन्माची कथा तर लोकमानसात प्रसिद्ध आहे. परंतु याचा आपण अध्यात्मिक योगाशय बघितला तर ते शक्य वाटते.
हनुमान मारुताचा पुत्र म्हणजे वायूचा पुत्र आणि अंजनी मातेचा म्हणजे ज्याचे जननात 'अन' म्हणजे अतिशय शक्तिशाली प्राणशक्ती असते, त्या अंजनी अवस्थेचा पुत्र होय. जन्मजात म्हणे हा सूर्याला खाण्याकरता उड्डाण करतो. सूर्य म्हणजे अग्नी तत्व. अग्नी तत्वाचे वर वायू तत्व असते. या अग्नी तत्त्वाला पचवून म्हणजे खाऊन साधक त्यावरील उच्च अशा वायू तत्वात जाऊ शकतो. म्हणून जन्मल्याबरोबर हनुमान आकाशात दिसणाऱ्या सूर्याला म्हणजेच अग्नीतत्वाचा खाण्याकरता म्हणजे पचवून टाकण्याकरता उड्डाण करतो. हनुमंताचे सूर्याला खाणे असे आहे.
ज्याला सुंदर हनुवटी असते अशा मानवाला रामायणकार हनुमान असे म्हणतात. इतर प्राण्यांना हनुवटीच नसते. म्हणून मानव हा हनुमानाच होय. शिवाय हा हनुमान वायु सुत म्हणजे तो वायु तत्वातील श्रेष्ठ साधक होय. वायु तत्वातील साधक व त्याची साधना अतिशय बलशाली असल्यामुळे हनुमानाला महाबली असे म्हटले आहे. संपूर्ण रामायणभर हनुमानाचे पराक्रम वर्णन केले आहे. रामाच्या सात्विकरूप सीतेचा शोध हनुमानच करतात. वायु तत्वातील साधक अतिशय नम्र निरंकारी बलवान आणि बुद्धिवान असतो. हनुमान असाच दाखविला आहे. हा सुग्रीवाचा दूत असतो, म्हणजे सुग्रीव अवस्थेकडे रामाला घेऊन जातो. राम आणि सुग्रीव यांचे सख्य झाल्यावर तो रामाचा दूत म्हणजे भक्त बनतो.
संदर्भ :- रामायण रहस्य - योगीराज मनोहर हरकरे
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा