वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी

 प्रश्न क्र. 33 :- चित्त, मन व बुद्धी यांना परमार्थ साधनेमध्ये बरेच महत्त्व आहे,  त्यांचा परस्पर संबंध कसा येतो ? तसेच अहंकाराचे उगम स्थान वरील कशात आहे ?

 चित्त :-  प्रत्येकांत परमेश्वराचा अंश असतो. आत्म्यातील परमेश्वराचे उच्च अस्तित्व म्हणजे चित्त. पाण्याच्या बुडबुड्यांत ज्याप्रमाणे संपूर्ण पाण्याचेच स्वरूप असते. तसे विश्वातील चैतन्याचे आकलन चित्ताने होते. चित्ताचे दर्शन म्हणजेच परमेश्वरदर्शन.

मन :- चित्ताच्या खालची अवस्था म्हणजे मन. शरीराला धरून संस्कारांमुळे जी अवस्था प्राप्त होते. त्या अवस्थेस मन म्हणता येईल. शांत पाण्यात दगड फेकल्याने कंपने निर्माण होतात. त्याचप्रमाणे संस्कारानुसार मनात कंपने निर्माण होतात. चांगली कंपने निर्माण होण्यासाठी सुसंस्कार आवश्यक असतात. मन शांत झाले की चित्त शांत होते. शुद्ध मनामुळे विकल्प निर्माण न होता आत्मदर्शन घडते. म्हणून मनावर सुसंस्कार व्हावेत. संकल्प आणि विकल्प हा मनाचा धर्म आहे.

बुद्धी :- मनाच्या वर बुद्धी असते. बुद्धी म्हणजे काय ? उपनिषद सांगतात

आत्मानं रथिनं विद्धि शरीरं रथमेव तु ।

 बुद्धिं तु सारथिं विद्धि मनःप्रग्रह मेव च ॥

 आत्मा रथाचा मालक असून शरीर हा रथ आहे. बुद्धी त्या रथाची सारथी असून मन संयमरूप लगाम आहे. भगवान श्रीकृष्ण अशा तऱ्हेने अर्जुनरथाचे सारथी व पंच सद्वृत्तिरूप पांडवांचे उपदेशक होत, ज्यामुळे कौरव पांडवात नेहमीकरिता चाललेल्या वृत्तिरूप युद्धात पांडववृत्ती निश्चितपणे विजय मिळविते. 'भग' म्हणजे कल्याणकारक आणि भगवान म्हणजे कल्याणकारक बुद्धि तत्त्व आहे. मनाच्या पेक्षा श्रेष्ठ बुद्धी समजली जाते.

अहंकाराचे उगमस्थान जिवात्म्यामध्ये आहे. आत्मा सर्वत्र आहे. परंतु शरीराच्या सतत संस्कारांमुळे मी कोणी तरी आत्म्यापेक्षा अलग आहे. "मी" हे भ्रमाने वाटते. हा "मी" पणा म्हणजे अहंकार. भक्तिमार्गात संपूर्ण समर्पणभावाद्वारे आपण होऊन प्राप्त झालेली मनाची शक्ती परमेश्वर अवस्थेत लावावी. अन्यथा भक्तिमार्गात समर्पण भावाऐवजी सुप्तावस्थेत अहंकार येतो. जो भक्तिमार्गाचा सर्वनाश करतो. मनाला स्थिर करण्यासाठी योग हा एक मार्ग आहे. सर्वच परममार्गात मन, चित्त, बुद्धी अहंकाररहीत ठेवण्यासाठी शांत, शुध्द अंतःकरणातून गुरू चरणीलीन होता आले पाहिजे.

संदर्भ :- विश्वयोगी काकाजी गुरू शिष्य संवाद समाधान

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://vaidik-vishwa.blogspot.com/

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य