वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - योगसाधना

 प्रश्न क्र. 19 :- मी योगा बद्दल ऐकले आहे पण 'योगसाधना' हा प्रकार काय आहे ? आणि तो सामान्यांच्या आवाक्यातला आहे काय ?

योगा बद्दल ऐकलं आहे हे चांगले आहे. हल्ली  योगाचा खूप प्रचार सुरू आहे. जगभरात योगदिवस साजरा करण्यास सुरू झाले आहे. फक्त त्या दिवशीच योगा करून भागणार नाही. त्यासाठी दररोजच्या जीवनप्रणालीतपण ते समाविष्ट केले जावे. योग फक्त शारिरिक स्वास्थासाठी नसून त्याही पलीकडे योगाचे सामर्थ्य आहे हे सर्वसाधारण लोकांपर्यंत जो पर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत योगसाधना म्हणजे काय हे समजणार नाही

 योग म्हणजे निम्न अवस्थेला उच्च अवस्थेशी जोडणे.* शरीर आत्म्याला जोडणे, आत्मा परमात्म्याला जोडणे, कुसंस्कारांना सुसंस्कारांशी जोडणे उच्च अवस्था प्राप्त करणे हे फक्त वैदिक परंपरेतच आपल्याला आढळते. आपल्या जीवनांत असंख्य गुपिते दडलेली आहेत. *साधनेच्या मदतीने वरची अवस्था प्राप्त करणे यास 'योगसाधना' म्हणतात.  योगसाधने द्वारे ज्ञान प्राप्त होते. ही ज्ञानप्राप्ती आपणांस पुढील चार योग मार्गाने होते. ) भक्तियोग ) कर्मयोग ) राजयोग ) ज्ञानयोग

सर्वसाधारण ९९.५० % लोक भक्तियोग मार्गी आहेत. भक्तियोग सर्वात सोपा चांगला असतो. परंतु यात गुरू चांगला असावा लागतो. तो जर अहंकारी असेल तर बुवाबाजी वाढते. संप्रदाय निर्माण होऊन त्यात भांडणे होतात. सर्व व्यक्तिंचा पिंड समान नसतो. वैद्यकीय शाखेत जसा विद्यार्थी आपल्या आवडीप्रमाणे कान, नाक, घसा, हृदय तज्ञ वगैरे विविध शाखा निवडतो तसे व्यक्तीच्या मनाच्या संस्कारांनुसार त्याला वाव देणे आवश्यक असते. प्रत्येकाला त्याच्या-त्याच्या पिंडधर्मानुसार साधना सांगावी लागते, करावी लागते. ही वैदिक परंपरा खालच्या अवस्थेतून वरच्या अवस्थेत जाऊन मुक्ती मिळवणे म्हणजे अष्टांग योग. या अष्टांगयोगात यम, नियम, आसन, प्राणायाम, ध्यान, धारणा, प्रत्याहार समाधि या आठ पायऱ्या आहेत. केवळ दाढी वाढविणे, श्वास धरून बसणे म्हणजे योगी ही चुकीची कल्पना आहे. अष्टांग योगातील वरील पायऱ्या साधून क्रमाक्रमाने वर चढून जातो तो योगी.

गुरुजी गोळवलकर, महात्मा गांधी हे महान कर्मयोगीच होते. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. 'अखंड देखणे निरंजन पाहणे योगिराज विनविणे  किंवा संत तुकाराम म्हणतात, 'तुका झालास पांडुरंग' योगमार्गात अशी उच्च अवस्था प्राप्त होते. कर्म हाच परमेश्वर मानून सर्वसामान्यांना देखील भक्तित योग सहज आचरीता येतो. या योगसाधनेतूनच पुढे ज्ञानयोग साधला जातो.

संदर्भ :- पूज्य काकाजींच्या गुरू-शिष्याच्या गोष्टीतील शंका समाधान

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी