वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा-जैनधर्माचे मूळ
प्रश्न क्र. 5 :- जैनधर्माचे मूळ वैदिक आहे काय ?
वेदकालात ऋषींबरोबर सदा मुनींचा उल्लेख येत असतो. जसे ऋषीमुनी. म्हणजे प्राचीन वेदकालापासून जैनमुनींनाही समाजांत फार मानाचे व महत्त्वाचे स्थान होते असे दिसून येते. म्हणूनच वेदकालांतील संस्कृत भाषा आजही जैनमत समाजाला अत्यंत प्रिय आहे. पशुहिंसा करू नये. सर्वांना परमेश्वर स्वरूप मानून त्यांचेशी तसा प्रेमाचा व्यवहार करावा, संयमी जीवन असावे इत्यादि उच्च तत्वांना प्रत्यक्ष आपले जीवनात उतरविण्याचा प्रामाणिक व काटेकोर प्रयत्न जैनमुनींनीच वेदकालांत सुद्धा केला. त्या वेदकाळांत जैनपंथ म्हणून असा समाज मूळ वैदिक समाजापासून वेगळा नव्हता. संत महात्मे जसे समाजांत राहून आपल्या संयमित वागण्यामुळे समाजापासून वेगळेच वाटतात. तद्वत् वैदिक काळात मुनी समाज ऋषितुल्य जीवन जगून समाजाला मार्गदर्शन करीत असे. मराठीत आपण ज्याला ज्ञान म्हणतो त्याचा मूळ वैदिक उच्चार 'ज्याँन' असा आहे. त्या ज्ञानाला अनुसरून ज्याचे प्रत्यक्ष वागणे असेल अशा व्यक्तीला जैन समजत असत. अशा तऱ्हेने वैदिक समाजाचा एक आदर्श घटक म्हणून त्या कालांत जैन समाज एक आदर्श जीवन जगत असे. कालांतराने हा समाज आपल्याला वेगळा मानू लागला. आपल्यातील महात्म्यांनाच पूज्य मानू लागला, आपले तत्वज्ञान व स्वप्न आदि कल्पना मूळ समाजापासून वेगळ्या मानू लागला. आणि अशा तऱ्हेने जैन समाज मूळ वैदिकमतापासून हळूहळू दूर व्हायला लागला. परंतु राष्ट्र दृष्ट्या जैन समाज अखेरपर्यंत भारतीयच राहीला आणि आज तसा तो आहेही. त्यामुळे जैनमत असलेले जैन हे मूळता वैदिकच आहेत.
संदर्भ :- रामायण रहस्य - योगी मनोहर
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा