वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - साधनामार्गतील प्रमुख अडथळे

 प्रश्न क्र. 8 :- साधनामार्गतील प्रमुख अडथळे कोणते ते दूर कसे करावेत ?

अहंकार हा साधनामार्गातील सर्वात प्रमुख अडथळा. स्वत:ला स्वतःचा अहंकार दिसत नाही. निर्माण झाल्याबरोबर तो नष्ट करावा. नुसता वरवर नष्ट केला तर तो पुन्हा पुन्हा डोके वर काढतो. झाड वाढू नये म्हणून जसे मुळापासून छाटावे लागते, तसाच अहंकार पण मुळापासून छाटावा लागतो. नाहीतर तो अधिकच फोपावत जातो. जास्तच नुकसान दायक होतो.

अहंकार नष्ट होण्यासाठी गुरूवर अढळ निष्ठा ठेवणेच आवश्यक असते. समर्थ रामदास स्वामींनी आपल्या शिष्यांना एकदा पायाला पट्टी बांधून सांगितले. माझ्या पायाला गळू झाले आहे. जर कोणी शिष्याने ते तोंडाने चोखले तरच ते कायमचे बरे होईल. एकही शिष्य पुढे येईना. अखेर कल्याण स्वामी पुढे आले. त्यांनी आनंदाने चोखले. समर्थानी पट्टीच्या आत पिकलेला आंबा बांधला होता. गुरूवर निष्ठा ठेवल्यानेच कल्याणाला गोड रस चाखण्यास मिळाला. म्हणून गुरूवर अढळ निष्ठा असणे अत्यंत आवश्यक असते.

अनेक वर्षे सातत्याने साधना केल्यानंतर संपृक्त द्रावाप्रमाणे अवस्था होते. स्लॅक येतो. आज साधना नाही केली तर ? एक दिवस केली तर काय बिघडते अशी वृत्ती होते. असे होता कामा नये. सातत्य रहावे. निष्ठा पक्की असावी. गुरूवर दृढ विश्वास हेच अहंकार दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो.

साधना करताना शंका नसावी, नागपूरच्या उत्तरेस दिल्ली आहे. म्हणून नागपूरहून दिल्लीला जायचे झाल्यास उत्तर दिशेने जावयास हवे. पण उलट दक्षिण दिशेने गेलो तर पृथ्वी गोल आहे. त्यामुळे उशीरा का होईना पण दिल्लीस पोहचू. प्रत्येकाची ग्रहण शक्ती भिन्न असल्याने त्यानुसार साधना सांगितली जाते. त्यावर निष्ठा अढळ ठेवावी.

संदर्भ :- विश्वयोगी पूज्य काकाजींच्या गुरू-शिष्याच्या गोष्टीतील शंका समाधान

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी