वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - शिवलिंग / शाळीग्राम

 रश्न क्र. 45 :- शिवलिंगाचा अर्थ काय ? शाळीग्राम म्हणजे काय ? यावर बरेच वादंग आहे, ह्यावर एक प्रश्न घ्यावा म्हणजे सर्वाना त्याचे उत्तर मिळेल.

सर्वश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधिच्या बाजूला असलेले प्राचीन शिवलींग सिद्धेश्वर मंदिर सर्वश्रुत आहे. संत नामदेवांनी या स्थानाचे महत्व सांगितले आहे, "नामा म्हणे देवा पुरातन स्थान । ऐसें नारायणें दावियेलें।।" जगभर पुरातन शिवालय अधिक आहेत. शिवलिंग पूजनाचे सनातन धर्मात खूप उपासक आहेत. म्हणून शिवालयांवर जास्त आघात झालेत. मध्यंतरी भारतावर मुघलांच्या जुलमी अंमलाखाली हिंदूंच्या बऱ्याचशा मंदिरांवर, समाध्यांवर व शिवालयांवर मुसलमानांनी हिरव्या चादरी चढवून त्यांना पीर बनवून त्यांच्या कबरी बनवल्या होत्या. असा इतिहास आहे. परंतु स्वाभिमानी हिंदूंनी त्या करता न्यायालयात सतत संघर्ष करून त्यावर भगवा चढवला. अजूनही बऱ्याच ठिकाणी वादंग आहेत. वाद होण्याचे दोन कारणे असतात. एकतर स्वतःचे वर्चस्व वाढविण्यासाठी समाजात दहशतीचे वातावरण तयार करून, त्यांच्या श्रद्धास्थानांवर हल्ले करून मनोधैर्य खचवणे. दुसरे वाटेल त्या खालच्या स्तरावर जाऊन समाजामध्ये धर्माच्या नांवाने फूट पाडून सत्ता मिळवणे व वाढवणे. हा पूर्वापार चालत आलेला राजकारणाचा भाग आहे. जे काही धार्मिक वादंग आहेत, ते न सोडवता तसेच ठेवणे. हा राजकीय खेळ असावा. सर्व धर्मियांनी आत्ता मतभेद न करता सामोपचाराने, जसे राम जन्मभूमीचा प्रश्न सोडवला तसे, इतर धार्मिक वादंग टाळून खरे ज्ञानोपासक व्हावे. अशी अपेक्षा करू.

शिवलिंगाचा अर्थ शिव म्हणजे कल्याणकारी पूर्ण अवस्था व लिंग म्हणजे पिंड होय. स्त्रीलिंग किंवा पुल्लिंग जातीच्या देहाला पिंड म्हणतात. शिवलिंगाला पिंड सुद्धा म्हणतात. पुराणामध्ये प्रकृती-परमेश्वरीय तीन अवस्था मानल्या आहेत. ब्रह्मा विस्तार करतो ,विष्णू त्याचे पालन करतो आणि शिव संहार करतो. लिंगमहापुराणात कथा आहे की ब्रह्मा व विष्णुत श्रेष्ठत्ववाद निर्माण होऊन विकोपाला गेला. तेव्हा अग्नीज्वालाद्वारे एक लिंग उत्पन्न झाले.त्याचे रहस्य जाणण्यासाठी त्यांनी शोध घेतला. परंतु त्याचा स्रोत नाही मिळाला. निराश होऊन दोन्ही परतले, तेव्हा लिंगातून ओम् स्वर उत्पन्न झाला. त्या दिव्य स्वराची आराधना करण्यात आली. ब्रह्मा- विष्णूंच्या तपश्चर्येने त्या लिंगातून शिव प्रगटले. शिवाचे प्रतिकरूप तेथे शिवलिंग स्थापित झाले. शिवलिंग म्हणजेच पिंडाची कल्याणकारी पूर्ण अवस्था होय.

वैदिक परंपरा व संस्कृती प्रत्यक्ष अतींद्रिय अनुभवावर आधारित असल्यामुळे विश्वाची रचना व मूळ अवस्था याचे ऋषिमुनींनी, आपल्या अतींद्रिय शास्त्रीय अनुभवांवरून, वेदांमध्ये वर्णन केले आहे. विश्वाच्या उत्पत्तीचे ऋग्वेदाच्या नासदीय सुद्धा मध्ये सर्व तत्वांच्या पलीकडे एक तत्वहीन तत्व व अवस्थाहीन अवस्था आहे, जिला परातत्व किंवा परमात्मा असे म्हणतात. अशा तत्त्वहीन अवस्थेतून जगाचा व्यापार कसा सुरु झाला याचे वर्णन सुद्धा वेदातच आहे. प्रथम जी तत्त्वहीन स्पंदनात्मक परंतु विधायक अवस्था होती, त्यातून प्रत्यक्ष सत्य म्हणजे काही तत्व किंवा अवस्था निर्माण झाली. सत्यावस्थेतून अखिल स्पंदनात्मक जगतात पुन्हा तपस् म्हणजे एक प्रक्रिया सुरू झाली विश्वाच्या उत्पत्ती पूर्वी ब्रह्मदेवाने तप केले ही कथा सत्यावर आधारित आहे. हे विश्व मुळातच पाच तत्त्वांचे बनलेले आहे. ही मूळ पंचतत्वे म्हणजे आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही होय. आकाश तत्वाला सर्व तत्वांचे मूलतत्त्व मानण्यात आले आहे. 'आ' म्हणजे अंतर्बाह्य व 'काश' म्हणजे व्यापणे. विश्वातील त्या मूलस्वरूपात विलीन होणे मानवाचे ध्येय असते. आकाशतत्वात शिवलिंग प्रगटले. म्हणून "शिवो भूत्वा शिवम् यजेत्"  शिवाचं पूजन शिव होण्याकरिता करायचे आहे.

शाळीग्राम म्हणजे एक विशिष्ट आकाराचा गोल जो प्राकृतिक स्वरूपात ठराविक नदीत मिळतो. शाळीग्राम रंगाने काळी अशी शिळा जी जीवाश्म रूपात असते. वैदिक ज्ञानमय परंपरा व आजचे विज्ञान हातात हात घालून चालले आहे. आजच्या विज्ञानाने हे सिद्ध केले आहे की, सर्व दृश्यमान जग अगणित काळापूर्वी एका महान कृष्णविवर (Black hole) यातून उत्सर्जित झाले आहे. त्याला 'बिग बॅंग थेअरी' म्हणतात. कृष्णविवर जगाची ती मूल अवस्था काळीकुट्ट व काळाचे वर आहे. साधक साधना करता करता त्या मूल अवस्थेत चित्ताद्वारे जात असतो. त्या मूल अवस्थेचे चित्त हे महाद्वार आहे. ज्ञानेश्वरांनी समाधिस्थळाची निवड केली. त्याचे वर्णन करताना नामदेव सांगतात, " उघडिली शिळा विवराची"  यानुसार पुराणांतील कथा जरी अशक्यप्राय वाटत असल्या तरी त्यामागे अध्यात्मिक रहस्य दडलेली आहेत. आपण त्या कथांमधे अध्यात्मिक अर्थासोबत वैज्ञानिक दृष्टीकोनातून बघणे अत्यावश्यक आहे.

संदर्भ :- योगीराज मनोहर हरकरे यांच्या ज्ञान आणि विज्ञान साहित्यातून विश्लेषण.

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी