वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - गुरु समोर नसताना साधनेतील प्रगती

प्रश्न क्र. 43 :- प्रत्यक्षात गुरु समोर नसताना साधनेतील प्रगती बाबत संभ्रम निर्माण होतो त्या वेळी काय करावे ?

बऱ्याचश्या साधकांना हा प्रश्न सतावत असतो. अशावेळी काय करावे. भौतिकजगता प्रमाणे आपली इच्छा प्रत्यक्ष गुरूला बघायची असते. पण तसे होत नाही. त्यापाठीमागे एक कारण आहे ते म्हणजे आपल्या मनाचे संस्कार. हे संस्कार एवढे घट्ट असतात की ते सुटता सुटत नाहीत. त्यामुळे संभ्रम निर्माण होतो व साधक त्यातच गुरफटला जातो. असा संभ्रम निर्माण होऊ नये म्हणून मनाच्या संस्काराची गाठ हळूहळू सोडवण्याचा प्रयत्न करणे होय. हे प्रयत्न गुरूने सांगितलेली साधना करूनच सुटणार असतात. गुरुवर अतूट श्रद्धा हाच यावर एक मात्र उपाय आहे. पण प्रत्यक्षात गुरु समोर दिसत नाही, आपण त्या गुरुला जड देहात बघतो. गुरूने सांगितलेली साधना हेच गुरुतत्व होय. गुरु म्हणजे श्रेष्ठत्व. गुरु म्हणजे साधकाला उच्च पदाला घेऊन जाणारे परम तत्व. ते परमेश्वरस्वरूप आपलं कार्य सुक्ष्म रूपाने करत असतात. साधकाला काय हवे-काय नको याची पूर्ण जाणीव त्या तत्त्वाला असते. आपण फक्त भौतिकतेने जडत्व शोधत असतो, आणि संभ्रम तयार करत असतो. मात्र मनावरील संस्काराला फुंकर घालून चित्तातील त्या परमतत्वाला बघण्याचा दृष्टिकोन ठेवत नाही. या जड देहाने त्या प्रत्यक्षातील देहाला सुक्ष्मरूपात आपल्यातच पाहण्याचा प्रयत्न करावा. या जाणिवेतूनच आपणास संकेत मिळतात. माता बाळाचा हात धरून चालणं शिकवते. कालांतराने बाळ आपणहून चालतं. त्यास आपल्या आजूबाजूला आईची जाणीव होते. त्याला माहित असते की आई आपल्याला पडू देणार नाही. अशी भावना साधकांसाठी संभ्रम दूर करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

"एकतत्त्व नाम साधिती साधन । द्वैताचे बंधन न बाधिजे ॥" संत ज्ञानेश्वरांनी हरिपाठात सांगितले आहे. या एकत्वाची साधना करताना साधक आत्मारामाचा सतत नामजप करीत असतो, त्यामुळे त्यांना द्वैताचे बंधन बाधत नाही. अर्थात साधक द्वैत म्हणजे भ्रमात्मकतेत राहत नाही. सतत गुरू नामस्मरण साधून एकतत्व पाहू शकतो. साधनेतील प्रगती बाबत संभ्रम होत नाही. योग्यवेळी गुरू मार्गदर्शन मिळणारच ! अतूट श्रध्दा व दृढ विश्वास अशावेळी उपयुक्त ठरतो. माऊली हरिपाठात म्हणतात, "एकतत्त्व नाम दृढ धरीं मना । हरीसी करुणा येईल तुझी ॥" मानवी जीवनात एकच तत्व आहे आणि ते हरीचे नामस्मरण होय. हे मना ! ते नामस्मरण तू दृढ चित्ताने कर त्यामुळे तुझी त्या परमेश्वररुप हरीला तुझी करुणा येऊन तो तुला आपलासा करेल.

संदर्भ :- हरिपाठ साधना महात्म्य - योगीराज मनोहर हरकरे

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी