सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - पूर्वजन्माचा दृष्टान्त
----------------------------
पूर्वजन्माचा दृष्टान्त
----------------------------
कृष्ण दर्शनानंतर, योगी मनोहरांना पूर्वजन्माच्या स्मृतीची दिव्य अनुभूती आली. पस्तिशीच्या वयातील एका दिव्य पुरुषाचे दर्शन त्यांना नेहमी होऊ लागले. त्या दिव्य पुरुषाचे दर्शन त्यांना ते स्नानाला बसल्यावर होत असे. स्नानाच्या वेळेस त्या दिव्य पुरुषाची आकृती त्यांचेपुढे साकारत असे. त्या दिव्य पुरुषाचे शरीर सुंदर असून गौर वर्णाचे होते व कुरळे केसांसोबत तशीच दाढीमिशी त्यास होती. या दिव्य पुरुषाच्या दर्शनाचे वेळेस योगी मनोहरांचा जीव अतिशय घाबरत असे. त्या दिव्य पुरुषाचे दर्शन पुढे त्यांना बराच काळ होत राहिले. मात्र तो दिव्य पुरुष कोण असावा याचे ज्ञान मात्र त्यांना होत नव्हते. पुढे माउलींच्या कृपेने योगी मनोहरांना याचा उलगडा झाला. तो दिव्य पुरुष म्हणजे त्यांचा स्वतःचाच मागील जन्म होता. त्यांचा मागील जन्म सातशे वर्षांपूर्वी भारताच्या नेफा भागात झाला होता. ते योगीपुरुष असून त्या भागातच (हिमालयात) तपस्या करत होते. त्यांच्या त्या मागील जन्माचे रूप त्यांना या दिव्य योगीपुरुषाच्या रूपाने दिसत होते. पूर्वजन्माची स्मृती झाल्यावर मात्र पुन्हा त्या दिव्य पुरुषाचे असे दर्शन त्यांना पुढे झाले नाही. म्हणजे जवळपास ज्ञानदेवांच्या काळानंतर योगी मनोहरांचा पूर्वजन्म हिमालयात झाला होता आणि त्यानंतर सातशे वर्षांनंतर त्यांचा हा जन्म झाला होता. पुढे योगी मनोहरांनी अनेक वर्षांनी पुनर्जन्माचा सिध्दान्तच त्यांच्या 'जन्म- मृत्यू रहस्य' या ग्रंथात मांडला. जन्म- पुनर्जन्मावर इतक्या शास्त्रशुध्द पध्दतीने लिहिला गेलेला हा विश्वातील पहिलाच ग्रंथ होता.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा