सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - निराकार दर्शन

 निराकार दर्शन

योगी मनोहर हे निराकारपिंडी साधक होते. आतापर्यंत त्यांना आपतत्त्व, अग्नितत्त्व, वायुतत्त्व व आकाशतत्त्व अशा सगळ्या तत्त्वांची दर्शने साकारपणे झाली होतीच. आपतत्त्वाचे साकार दर्शन म्हणजे भगवान शिवशंकर, अग्नितत्त्वाचे म्हणजे गणेश दर्शन, वायुतत्त्वाचे साकार दर्शन म्हणजे हनुमान दर्शन आणि आकाशतत्त्वाचे साकार दर्शन म्हणजे भगवान गोपाल कृष्णाचे दर्शन. अशी सगळ्या तत्त्वांची साकार दर्शने होत असतानाच योगी मनोहरांना त्याने त्या तत्त्वांची निराकार दर्शनेसुध्दा होत असत. निराकार दर्शन म्हणजे त्या-त्या तत्त्वाचा निराकार अनुभव. आपतत्त्वाचा शुभ्र वर्णानुभव ज्याला रंग, स्पर्श, चव, गंध असे सर्व गुण आहेत, अग्नितत्त्वाचा अग्निवर्ण ज्याला पंचगुण आहेत आणि आकाशतत्त्वाची नीलिमा, नीलवर्ण जो संपूर्ण विश्वात व्यापलेला असून त्याला रंग, स्पर्श, चव, गंध असे गटं असा अनुभव त्यांना प्रत्येक साकार दर्शनाचे वेळी येत गेला. जिथे आकार नाही ते निराकार पंचगुणात्मक दर्शन.व योगी मनोहर सांगत की निराकार दर्शनाचे वर्णन शब्दांपलीकडील आहे. ज्ञानेश्वर माउलींनीसुध्दा साकार निराकाराचे दर्शन घेतल्यावर अचंबित होऊन 'तुज सगुण म्हणो की निर्गुण रे' असे सुंदर पद लिहिले आहे. योगी मनोहरांनीही माउलींप्रमाणेच या निराकाराची अतिउच्च अनुभूती घेतली होती..


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी