सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - दिव्य सिध्दींची प्राप्ती

 -----------------------------------------

अनेक दिव्य सिध्दींची प्राप्ती

-----------------------------------------

मनोहररावांची कुंडलिनी शक्ती जागृत झाली असल्यामुळे त्यांना आता अनेक दिव्य सिध्दी प्राप्त झाल्या होत्या. दूरश्रवण, दूरदर्शन, दुसऱ्याच्या मनातले विचार ओळखणे, वाचासिध्दी, मंत्रसिध्दी, स्वरसिध्दी, रागांचे पंचगुणात्मक गायन अशा अनेक सिध्दी मनोहररावांना प्राप्त झाल्या होत्या. पुढे अनेक वर्षांनी त्यांनी 'कुंडलिनी जागृती' हा शास्त्रशुध्द ग्रंथ मराठी, हिंदी, इंग्रजी या तिन्ही भाषेत लिहिला. कुंडलिनी जागृती म्हणजे काय? कुंडलिनी जागृत झाल्यावर काय-काय दाहक अनुभव येतात? कुंडलिनी जागृती कशी करावी? याची पूर्ण उकल त्यांनी या ग्रंथात केली. कुंडलिनी जागृत झाल्यानंतर अनेक सिध्दी तर प्राप्त होतातच शिवाय, अनेक देवतांची सजीव दर्शनेही होतात. ज्ञानेश्वर माउलींनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात याबद्दल विस्तृत सांगितले आहे. योगी मनोहरांनी स्वानुभवाच्या आधारे कुंडलिनी जागृतीचे अगाध ज्ञान त्यांच्या ग्रंथाद्वारे जगापुढे ठेवले.


गौतमबुध्द, येशू ख्राइस्ट व मोहम्मद पैगंबर यांचे दर्शन

याच काळात मनोहरावांना देवतांचे, साधू संतविभूतींचे सजीव दर्शन झाले. गौतम बुध्द, येशू ख्राइस्ट व मोहम्मद पैगंबर यांची दर्शनानुभूती त्यांनी सांगितली ती अशीः गौतमबुध्द सुंदर पुरुष होते. वर्ण गौर, लांब केस, विरळ दाढीमिशी असे सुंदर रूप होते. येशू ख्राइस्ट हे दिसायला सुंदर होते. अतिशय गोरा रंग, लांब केस आणि दाढीमिशी असे येशूचे रूप होते. नाक मात्र थोडे आखूड होते. मोहम्मद पैगंबर यांचे दर्शनात ते ६ फूट उंच दिसले. डोक्यावर चौल तथा दाढीमिशीचा चेहरा. मिशी सरळसोट होती. डोळे तिरकस होते. शरीरयष्टी सडपातळ आणि वर्ण गव्हाळी होता. मनोहररावांना ताजुद्दीन बाबांचेही दर्शन झाले होते.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी