सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ॐकार षट्चक्रभेदन (ध्यान प्रक्रिया)
-------------------------------------------------
ॐकार षट्चक्रभेदन (ध्यान प्रक्रिया)
-------------------------------------------------
ध्यान प्रक्रिया
नाकाद्वारे छातीमध्ये पूर्ण श्वास भरून घ्या. नंतर तोंडाने धीर गंभीर आवाजात ॐचा नाद करा त्या नादानुसंधानात प्रथम 'मुलाधार' चक्रावर ध्यान केंद्रीत करा. ॐ चा स्वर चालू द्या. ॐचा नाद करताना प्रथम तोंडाने ओ म्हणावे व श्वास संपताना मुख बंद करतांना लयबद्ध आवाजात मकार म्हणावा.
नंतर परत खूप श्वास घेऊन उच्चा नाद करून प्रथम मूलाधाराला ध्यानानेच स्पर्श करून 'नाभिचक्रावर' ध्यान केंद्रित करा. ॐचा स्वर चालू ठेवा.
पून्हा खूप श्वास घेऊन ॐचा नाद करून वरीलप्रमाणेच प्रथम 'मूलाधार' नाभिचक्राला ध्यानानेच स्पर्श करून 'हृदयावर' ध्यान केंद्रित करा. परत चौथ्यांदा श्वास घेऊन ॐच्या नादाबरोबरच मूलाधार, नाभी, हृदय या चक्रांना ध्यानानेच स्पर्श करून 'कंठावर' ध्यान स्थिर करा.
पाचव्यांदा वरीलप्रमाणेच ॐच्या पाचही चक्रांना क्रमाने ध्यान स्पर्श करून 'भ्रूमध्यावर' ध्यान स्थिर करा.
शेवटी वरील प्रमाणे ॐच्या नादाबरोबर मूलाधारा पासून भ्रूमध्या पर्यंतच्या प्रत्येक चक्राला स्पर्श करून 'सहस्रार' चक्रावर ध्यान स्थिर करा. याप्रमाणे एक-एक चक्राचे भेदन करत साधकाने सहस्त्रार चक्रावर ध्यानमग्न होऊन स्थिर व्हावे.
'सहस्त्रार' चक्रामध्ये स्थिर होताना खाली दिलेल्या मंत्रपुष्पांजलीचे मनातल्यामनात स्वरांसहित स्मरण केल्याने ध्यानामध्ये अधिक लाभ होतो.
॥ मंत्रपुष्पांजली ।।
ॐ यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन् ॥
तेहनाकं महिमानः सचंत यत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ||
ॐ राजाधिराजाय प्रसहा साहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ॥
स मे कामान् कामकामाय महां ॥
कामेश्वरो वैश्रवणो ददातु ॥
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः ॥
ॐ स्वस्ति, स्वाम्राज्यं भौज्यं, स्वाराज्यं, वैराज्यं, पारमेष्ठयं राज्यं ॥
महाराजमाधिपत्यमयं समंतपर्यायीस्यात ॥
सर्वभौमः सर्वायुष आंतादापरार्धात् ॥
पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिति ॥
तदप्येष श्लोकोऽ भिगितो मरुतः परिवेष्टारो मरुतस्याऽवसन् गृहे ॥
आविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद् इति ॥
हरी ॐ तत्सत्
याप्रमाणे ओमच्या ॐकार षट्चक्रभेदन प्रक्रिया दररोज केल्याने काही 'काळानंतर साधक खोल ध्यानात जाऊन सर्व ज्ञान प्राप्त करू शकतो. अशा प्रकारे ध्यान केल्याने आपोआप ज्ञान प्राप्त होते. पुस्तके वाचून आपणास फक्त माहिती मिळते, ज्ञान नाही. याबाबत श्रीमद् भगवद् गीता म्हणते:
नही ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते । तत्स्वयं योग संसिद्धः कालेनात्मनि विन्दती ॥
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा