सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - दोन अलौकिक योगसाधना

 ---------------------------------------------------------------

योगी मनोहरांद्वारे दोन अलौकिक योगसाधनांची निर्मिती योगनिद्रा आणि षट्चक्रभेदन

---------------------------------------------------------------

योगी मनोहरांचे नाव ऐकून आणि वैदिक विश्वचे नाव ऐकून अनेक तरुण साधक व मोठमोठ्या व्यक्ती योगी मनोहरांशी जोडल्या गेल्या होत्या. या साधकांना योगी मनोहर वेळोवेळी साधना शिकवत असत आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करत असत. याच काळात योगी मनोहरांनी स्वत:च्या आध्यात्मिक अनुभवावरून दोन अलौकिक योगसाधनांची संगीताच्या माध्यमातून निर्मिती केली.

त्या अलौकिक योगसाधना म्हणजे 'योगनिद्रा' आणि 'षट्चक्रभेदन' अखिल मानव समाजाच्या कल्याणासाठी योगी मनोहरांनी साधनांची निर्मिती केली होती. या दोन साधनांतून साधकाला आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक असे तिन्ही प्रकारचे लाभ होत असत. या साधना शिकविताना योगीजींनी स्वतः निर्माण केलेल्या या दोन अलौकिक योगसाधनांची माहिती त्यांच्याच शब्दांत अशी करून दिली आहे.

-------------------------------------------------

ॐकार षट्चक्रभेदन (ध्यान प्रक्रिया)

-------------------------------------------------

प्रक्रिया : प्रथम पद्मासन घालून बसा. पाठीचा कणा सरळ ठेवा. खांदे थोडेसे उचला. मांडीवर नाभीजवळ डाव्या तळहातावर उजवा तळहात ठेवा (श्री ज्ञानेश्वर माउली चित्र पान क्र. ८३ प्रमाणे) आणि ध्यान प्रक्रिया सुरू करा.

* ध्यान करताना आपल्या शरीरातील जी सात योगचक्रे आहेत त्यावर क्रमाक्रमाने ध्यान लावावे. त्यातील पहिले 'मूलाधार चक्र' म्हणजेच गुद्वार व जननेंद्रिय यामधील शिवण 

* दुसरे योगचक्र 'नाभी स्थान' बेंबीमध्ये

* तिसरे 'हृदया' मध्ये म्हणजे छातीचे मधोमध

* चौथे 'कंठस्थान' कंठामध्ये

* पाचवे तालूस्थान म्हणजेच जिमेचे आतील टोकाच्या वरील भागावर (पडजिभेच्या वर)

* सहावे चक्र 'भ्रुमध्य' म्हणजे दोन्ही भुवयांच्या मधोमध

* शेवटचे सातवे चक्र 'सहस्रार' म्हणजेच डोक्यावर अगदी मधोमध, लहान मुलाला जन्मल्यावर डोक्याला जिथे हाड नसते तो टाळूचा भाग.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी