सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य
------------------------------------------------
ज्ञानदानाचे महान कार्याला सुरुवात
------------------------------------------------
योगी मनोहरांची आध्यात्मिक साधना तर काही वर्षांपूर्वीच पूर्ण झाली होती. पंचतत्त्वांची साकार निराकार अनुभूती, कुंडलिनी जागृती, अनेक देव-देवतांची दर्शने, अनेक आध्यात्मिक मंत्रसिद्धी, विश्वाचे मूळ कृष्णविवर व महाशून्य अवस्थेचा अनुभव, समाधी अवस्था, शवासन साधना, संपूर्ण विश्वाचे ज्ञान होणे, पूर्वजन्मस्मृती अशा अनेक आध्यात्मिक अनुभूती योगी मनोहरांनी प्रत्यक्षपणे घेतल्यामुळे त्यांचे आध्यात्मिक जीवन आता संपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण असे झाले होते. त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या. आध्यात्मिक क्षेत्रातील एक अधिकारी पुरुष म्हणून सर्व त्यांना ओळखू लागले होते. योगी मनोहरांनी आता प्राप्त केलेल्या ज्ञानाचा समाज कल्याणासाठी उपयोग करण्याचे ठरविले. इथूनच एका महान कार्याची (वैदिक विश्व) सुरुवात होणार होती.
प्राप्त केलेले ज्ञान समाजाला देण्याचे महान कार्य महर्षी वाल्मिकी, वेद व्यास, आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर माउली इत्यादी महान पुरुषांनी सदैव केले. हीच शृंखला पुढे चालविण्याचे योगी मनोहरांनी ठरविले. समाजाला अज्ञानाच्या अंध:कारातून बाहेर काढणे हे कार्य प्रत्येक संतांनी केलेले आहे. त्यासाठीच संतांचा अवतार असतो. योगी मनोहरांनीसुद्धा प्राप्त केलेले ज्ञान समाजाला देण्याचे ठरविले. यासाठी त्यांनी एक कार्यपद्धती ठरविली. योगशिबिरे घेऊन प्रत्येकाला अध्यात्मसाधनेची गोडी लावणे, आध्यात्मिक विषयांवर व्याख्याने करून सर्व भारतीय ग्रंथांमधले ज्ञानविज्ञान शास्त्रशुद्ध पद्धतीने समाजाला समजावून सांगणे आणि पुस्तकरूपाने संपूर्ण आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार मानवसमाजात करणे असे या कार्यपद्धतीचे स्वरूप होते.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा