सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - विश्वात्मक वैदिकता
------------------------------
विश्वात्मक वैदिकता
-------------------------------
संपूर्ण जग एकेकाळी वैदिक परंपराभिमानी कसे होते याची प्रचिती आजही देशांच्या नावावरुन इतिहासावरुन, आचार आणि परंपरा या मधून पाहणे माहितीपूर्ण व मनोरंजक होईल. रशियातील भाषाकोविद श्री. लेब सिलेन्को भारतात आले होते. त्यांचा भाषाशास्त्र, इतिहास व आचार परंपरांच्या अभ्यासाचा निष्कर्ष हा होता की, इसवीसनापूर्वी रशियात व युरोपात वैदिक परंपरेचे अवलंबन केले जात होते शिवाय आजही रशियन व युरोपयीन भाषांमध्ये शेकडा पन्नास टक्के शब्द संस्कृतोद्भव आहेत. कांही शब्द तर संस्कृत शब्दांचे भ्रष्ट उच्चार आहेत. जसे नाविक नेव्हीक, पथ-पाथ, सम सेम, अब्रहा, इत्यादी. श्रीयुत लेव सिलेन्को यांनी वैदिक जीवन प्रणालीच्या अभ्यास व प्रचारासाठी जगात काही शाखाही स्थापन केल्या आहेत.
अफगाणिस्थानातील एका विद्वानांचे म्हणणे असे आहे की, रामायण हा इतिहास असेल तर तो त्यांच्याच देशात घडलेला आहे, कारण रामायण उल्लेखिलेल्या अयोध्या, शरयू आणि इतरही देश व नद्या त्यांच्या देशात आहेत. एक मुस्लिम देश असूनही हिन्दोशिया (इंडोनेशिया) स्वतःला 'रामायण देश' म्हणवून घेण्यात धन्यता मानतो. सिलोन, मलाया, ब्रह्मदेश इत्यादी दक्षिण पूर्व देशांची हीच निष्ठा आहे. काही दिवसांपूर्वी इराक या मुस्लीम देशात उत्खनन करण्यात आले तेव्हा स्वस्तिक चिन्ह असलेला दगड व त्या वेळच्या
इराकी स्त्रीची मूर्ती सापडली की जी भारतीय पद्धतीची साडी नेसलेली होती. हे अवशेष इ. स. पूर्व ३००० सालातील असल्याचे मानले जाते. स्वस्तिक चिन्ह व भारतीय साडी हे वैदिक परंपरेतील अध्यात्मिक व भौतिक जीवनाचे चिन्ह आहे. यावरून इराकमध्ये वैदिक जीवन पाच हजार वर्षापूर्वी प्रचलीत होते हेच सिद्ध होते.
रशियाचे खरे नाव 'ऋष्या' आहे, जे संस्कृत शब्द 'ऋष्येय' वरून आलेले आहे. आजही रशियन लोक स्वतःला 'ऑव्ह' हे संस्कृत पाचारण विशेषण लावून स्वतःला धन्य मानतात. उदा: मोलोतोव्ह, गोर्बाचोव्ह इ. रशियाच्या दक्षिणेला असलेल्या मंगोलिया देशात अनेक संस्कृत ग्रंथ सापडले आहेत. पूर्वेला जपान, कोरिया इ. बुद्धमतवादी अर्थात वैदिक परंपरावादी देश आहेत. संस्कृत 'कुर्याति' शब्दावरून कोरिया शब्द बनला तर मंगलमय शब्दापासून मंगोलिया शब्द बनला. जपानचे खरे नाव 'निप्पान' आहे. संस्कृत 'पानीय' शब्दाचे उच्चारण व सुलभ नामांतर निप्पान होय. चीन या शब्दाला 'प्रा' विशेषण लावले असता 'प्राचीन' शब्द बनतो. त्यावरुन चिनी हेही प्राचीन काळी वैदिक होते हे सिद्ध होते. दक्षिणेकडील आणखी एक देश म्हणजे 'ऑरबेलियात' जो असुरालय शब्दाचा अपभ्रंश उच्चार आहे. आजही तेथील आदिवासी मावरीजन वसंत ऋतूमध्ये स्वस्तिक चिन्ह वैदिक परंपरेचे द्योतक आहे.
आफ्रिका खंड कालपरवापर्यंत जंगली व मागासलेला समजला जात होता. परंतु उत्तर आफ्रिकेतील पुष्कळ देशांची नावे संस्कृतेभव आहेत. जसे हजिम अगुम, सहारा आश्रय, न्यूबा नव. २५०० वर्षापूर्वी सहारा प्रदेश निबीड अरण्य होते. जे सहस्त्रावधी जीवांचे व मानवांचे आश्रय अर्थात सहारा होते. दुर्दैवाने आज तेथे वाळवंट आहे. -
'अरवस्थान' इस्लाम धर्माचे मुख्य प्रेरणास्थान आहे जे आजही कांही प्रमाणात वैदिक आहे. 'स्लाम' या संस्कृत शब्दाला 'अ' हे विशेषण लावून अस्लाम शब्द होतो. 'स्लाम' म्हणजे शांतता आणि अस्लाम म्हणजे विशेष शांतता. या अस्लाम शब्दाचा अपभ्रंश उच्चार 'इस्लाम' होय. अरबस्थान हा शब्दही संस्कृत अऋभुस्थान ह्या शब्दाचे सुलभ उच्चारण होय, ऋग्वेदामध्ये ऋभु ऋषींच्या पराक्रमाचे व पुरुषार्थाचे वर्णन आलेले आहे. एकदा त्यांनी अश्वमेध यज्ञ करण्याचे आयोजिले. परंतु यज्ञासाठी सुयोग्य अश्व मिळाला नाही. तेव्हा या ऋषींनी मनःसामध्यनि योग्य अश्व निर्माण केला, ऋग्वेदात त्याचे वर्णन आहे. 'तेन हरि मनसा निरतक्षत'. या वैदिक ऋभुऋषींचे स्थान कोणते राहील ? तर ऋभुस्थान, वैदिक परंपरेमध्ये मूर्तीपूजा नाही. ती निराकाराची पुरस्कर्ती आहे. आजही अरिभुस्थानातील इस्लाम धर्म निराकाराचा पूजक आहे. याप्रमाणे अरभूस्थान, 'अरबस्थान' या नावाने वैदिक परंपरेचा आदर्श ठेवून आजही धन्य आहे.
-डाॅ. दत्ताजी हरकरे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा