वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - गुरुकृपा - 2
प्रश्न क्र. 11 :- माझा एक प्रश्न आहे. आपल्याला गुरु कृपा झाली आहे. ती खरोखर झाली आहे की भास आहे हे कसे ओळखायचे ?
आयुष्यात गुरू मिळणं हीच गुरुकृपा होय. ही गुरूकृपा सहजतेने लाभत नाही. अनंत जन्माचे पुण्यसंचय व ऋणानुबंध असल्यानेच साधक होण्याचे भाग्य लाभते. हे भाग्य गुरुकृपेमुळेच साध्य होते. ते खरेच असते. तो भास असूच शकत नाही.
साधकाच्या मनात असा द्वितभाव प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. कारण ह्या भौतिक जगाचे संस्कार आपल्या मन, बुध्दी, चित्तवृत्तीवर होत असतात. यातून स्वतःला सावरून गुरूवर श्रध्दा पूर्वक विश्वास ठेवून पुढे जाणे, आपले आद्य कर्तव्य आहे. वैदिक परंपरेत गुरू-शिष्य परंपरेला अनन्य महत्व आहे. अढळ श्रद्धा-अतुट विश्वास हेच या नात्याचे गुपित होय. हे रहस्य उलगडण्यासाठी खरे गुरू किंवा संत आपले आयुष्य समाजासाठी पणाला लावतात. "देव तेथेची जाणावा" या प्रमाणे ते भेटणे दुर्मिळच असतात. ओळखणं तर लांबच असते. पण अशा देवस्वरूप गुरुची कृपा झाली तर खरोखर आपल्या सारखे भाग्यवान आपणच !
आपल्या गुरूने सांगितलेला साधना मार्गच आपल्यासाठी हितकारी असतो. तो कितीही कष्टदायी असला तरी चालतच राहावे लागते. हीच खरी गुरुकृपा ओळखावी. पण आपल्या प्रवृत्तीमुळे ते भासमान वाटते. कारण आपण आपल्या आजूबाजूला बघतो की त्यांना अध्यात्मा विषयी काही घेणे देणे नसते. त्यांना कुणी गुरू नाही. तरीपण ते भौतिक बाजूने खूप खुश असतात. मौज-मजा हेच त्यांचे आयुष्य असते.
भगवंत आपल्या आतच आहे. "नर करणी करे तो नर का नारायण होय।" स्वतःला जाणा आणि सगळ्यांना बरोबर घेऊन चला. एकट्याचा उद्धार वैदिक परंपरेला मान्य नाही.
संदर्भ :- पूज्य काकाजींच्या गुरू-शिष्याच्या गोष्टीतील शंका समाधान
शब्दांकन :- अशोक जी सोनार.
मो.क्र. 8149044910
प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.
https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा