वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा-राम आणि रामायण

  प्रश्न क्र. 3 :- राम आणि रामायण म्हणजे काय ?

  प्रश्न खूप लहान वाटत असला तरी त्याची उत्तर व्याप्ती खूप मोठी होऊ शकते. तरी काही थोड्या प्रमाणात आपण ते बघू.

 लहानपणा पासून आपण राम, लक्ष्मण, सीता, रावण वाल्मिकी ऋषी यांच्या रामायणातील गोष्टी ऐकत आलो आहोत. त्यातल्या काही गोष्टी मनाला पटतात. पण काही समजण्या पलीकडे असतात. त्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि सोडून देतो. ही गोष्ट एका पिढीतून दुसऱ्या पिढीत परंपरेने चालत असते. मग पुढेही अशी चालू ठेवायची का ? असा प्रश्न उपस्थित होतो. त्यासाठी आपण राम रामायण याचा सखोल चिंतनातून विचार केला तर ही चालत आलेली परंपरा, आजच्या सुशिक्षित विज्ञाननिष्ठ बुद्धिवान पिढीला खरोखरच पटेल काय ? वाल्याचा वाल्मिकी ते  सीतेचे धरणीत रामाचे शरयुत निर्वाण हे राम चरित्र म्हणजे रामायण आपण मानतो. आणि हे घडलं ते अयोध्या नगरीत. त्याचा आपण आध्यत्मिक रहस्य पाहू.

 वाल्मीकींनी रामायण लिहतांना सुरवातीलाच स्पष्टपणे अयोध्या नगरीचा उल्लेख केला आहे.

अयोध्या नाम नगरी तत्रासील्लोक विश्रुता

मनुना मानवेन्द्रेण या पुरी निर्मिता स्वयम् ||||

(सर्ग-, श्लोक वा)

म्हणजे अयोध्या नगरीची स्थापना मनुद्वारा म्हणजे मनाद्वारे झाली होती. मनु नावाचा एक राजा कल्पणे म्हणजे केवळ कल्पनाच होय. ही अयोध्या नगरी मुनीपुंगव वाल्मीकींच्या मनाची निर्मिती होय. श्रेष्ठ साधक मुनिपुंगव वाल्मीकीचे मनात वृत्तींचे द्वन्द्व म्हणजे युद्ध नसल्यामुळे असल्या मनाच्या अवस्थेला वाल्मीकि अयोध्या म्हणतात. अयोध्या म्हणजे निर्द्वन्द्व पिंड मनाची अथवा चित्ताची शुद्ध अवस्था होय.

ही आयोध्या नगरी दश योजने लांब दोन योजने रुंद होती. योजना शब्दावरून योजन शब्द झाला आहे. यावरून अयोध्या म्हणजे दशेन्द्रियाने घेरलेले साधकाचा पिंड आणि त्याला व्यास करणारे दोन मन आणि बुद्धी होय. असे यावरून स्पष्ट दिसते. आता दशरथ कोण हे पाहू. उपनिषदे शरीराला अथवा इन्द्रियाला रथ म्हणतात. "शरीर रथमेव तु" एका इन्द्रियाचा स्वामी एक रथ तर दशेन्द्रियांचा स्वामी दशरथ होय. याच पिंडरूप दशरथाचा आत्मानंदरूप राम म्हणजे दाशरथी राम होय. राम म्हणजे योग्यांच्या चित्तांतील परमानंद होय. 'रमन्ते योगिन: यास्मिन् रामः' किंवा 'रमन्ति इति राम:' अशी राम या शब्दाची परिभाषा आहे. सीता कायारुप पत्नी तर विवेकरुप लक्ष्मण. "प्रणयो धनुः शरो ह्यात्मा ब्रह्मतल्लक्षम् उच्यते." म्हणजे प्रणव वा साधना धनुष्य असून त्यावर आत्मारुप शर म्हणजे बाण  लावायचा आणि हा शर ब्रह्मरुप लक्ष्यावर मारायचा. तर रामायण अर्थात राम म्हणजे  आत्माराम 'अयन' म्हणजे मार्ग."आत्माराम प्राप्तीचा साधना मार्ग म्हणजे रामायण."

आता यावरून लक्षात आले असेल की रामायणातील प्रत्येक पात्रांच्या नावामागे आध्यत्मिक अर्थ दडलेला आहे. तसेच रामायण महाभारत हे ऐतिहासिक ग्रंथ नसून कवींचा कल्पनाविलास आहे. असे मानणारे विद्वान - योगीराज वासुदेवानंद सरस्वती, महात्मा गांधी पूज्य गोळवळकर गुरुजी यांनी सुद्धा त्यांच्यावेळी याआधी आप-आपल्या लेखातून उल्लेख केला आहे.

पू योगी मनोहर यांनी कठोर योग साधना करून, सखोल चिंतनाद्वारे, वैदिक परंपरेला धरून असलेले, शास्त्रशुद्ध आणि वैज्ञानिक स्पष्टीकरण आणि वाल्मीकींच्या रामायण ग्रंथातील रहस्ये उलगडून साधकांच्या साधना मार्गातील गुह्य सांगणारी रहस्ये. म्हणजे पूज्य काकाजींच्याद्वारे उच्च कोटी अवस्थेतील लिखित  *"रामायण रहस्य"* हा ग्रंथ रामायणातील दुर्लभ योगरहस्यांचे आकलन पुढील पिढीला नव्याने प्रकाश टाकून वैचारिक उंची वाढविणाऱ्या सर्व अभ्यासक जिज्ञासूंनी अवश्य वाचावा.

संदर्भ :- रामायण रहस्य - योगी मनोहर

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा. धन्यवाद

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी