वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा-जैन समाज आणि वैदिक परंपरा

 प्रश्न क्र. 6 :- जैन समाज आणि वैदिक परंपरा यांच्यातील मतसाम्य काय ?

वैदिक कालांतील उच्च आचारविचारांनी परिप्लुत असलेले ऋषींनी ब्रम्ह जाणल्यामुळे ब्राह्मण म्हणविले जात. तद्वत् आपल्या सुयोग्य चिंतनाने आणि वैराग्यशील आचरणाने समाजांत मान्यता पावलेले मुनी आपल्या ज्ञानामुळे जैन समजले जात. जैन आणि वैदिक समाज एकच समजल्या जात असे. आणि आजही त्या अर्थाने एकच आहे. जैनसमाज ब्राम्हण समाजाप्रमाणे निरामिष आहार करीत असे आजही करीत आहे. जैन हे ऋषीप्रमाणे ब्राह्मणच असत बऱ्याच प्रमाणांत आजही आहेत. वैदिक परंपरेत सांयकाळी अल्पशा प्रमाणात भोजन घेण्याची प्रथा होती. आजही जैन समाजात सूर्यास्तापूर्वी आहार घेण्याचे कटाक्षाने पाळले जाते. त्याकाळी ब्राह्मण ही जात नसून ब्रह्म जाणणाऱ्यांची एक परंपरा होती. ब्राह्मण्याला जातीयता नंतरच्या काळांत प्राप्त झाली, तसेंच मुनींना जैनत्व नंतरचे काळात प्राप्त झाले. तत्वा नुसार अहिंसा, सत्य, अक्रोध, प्रेम शुचीव्यवहार ठेवणारा एकच समाज त्याकाळी भारतात होता आणि तो म्हणजे कथित जैन समाज होय. नंतरच्या वैदिक काळांत ऋषींचे संतान म्हणविणारे वैदिकसुद्धा मांसाहार आणि मिथ्याचारांत रस घ्यायला लागले. परंतु मुनींचा समाज या सर्व लोभांपासून अलिप्त राहिला. तुकारामाप्रमाणे कडकडीत वैराग्य हे जैन समाजाचे जीवन बराच काळ टिकले. वेदसंमत तत्वज्ञान वैदिकांप्रमाणे जैनसमाजाला सतत मान्य होत आलेले आहे.  ज्याचे मन स्वतःचे ताब्यांत आहे तोच मुनी होय. जैन समाज हा आदर्श वैदिक समाजच होय. असे काकाजींचे प्रामाणिक मत आहे.

संदर्भ :- रामायण रहस्य - योगी मनोहर

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा. 

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी