वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - राहू -केतू

प्रश्न क्र. 34 :- राहू -केतू सूर्य-चंद्राला गिळतात व त्यामुळे सूर्य-चंद्राला ग्रहण लागते !! या कथेचा व्यास आशय काय आहे ?

आजचे खगोलशास्त्र प्रगतीपथावर आहे. निरनिराळे उपग्रह व अवकाश यान अंतराळात सोडून नवनवीन विक्रम केले जात आहे. पृथ्वीचा उपग्रह चंद्रावर मानवाने पाऊल आधीच टाकले आहे. आणि आता मंगळावर स्वारी करून यानाद्वारे संशोधन सुरू आहे. पृथ्वी व्यतिरिक्त अजून ब्रम्हांडात कुठे मानवी जीवन आहे, त्याचा शोध सुरू आहे. या सर्व अवकाश मोहिमेत ग्रहांच्या गती व स्थान आणि यानाचा वेग याचा सखोल अभ्यास करून संभाव्य मोहीम आखली जाते. वैज्ञानिक हे या युगातील ऋषीच समजावे. कारण या साऱ्या घटनांचे वैदिक काळातील ऋषींना सुद्धा "अतींद्रिय ज्ञान" असले पाहिजे. म्हणून त्यांनी त्याकाळीसुद्धा अशा कथा लिहून ठेवल्यात की आजच्या वैज्ञानिकांना ते अवकाश संशोधनात पथदर्शक ठरतात.

 सूर्य-चंद्राला ग्रहण लागते. ग्रहण म्हणजे आत्मसात करणे किंवा गिळणे. एक खगोलीय वस्तू दुसऱ्या खगोलीय वस्तूच्या आड येते, म्हणजेच निरीक्षकासाठी पहिली वस्तू दुसऱ्या वस्तूला झाकते, तेव्हा पहिल्या वस्तूने दुसऱ्या वस्तूला ग्रहण लावले असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य/चंद्र ग्रहण असते त्या दिवशी सूर्य/चंद्र हा राहूजवळ किंवा केतूजवळ असतो. म्हणूनच जनसामान्यांच्या दृष्टीने, ज्या दिवशी राहू किंवा केतू हे राक्षस सूर्याचा किंवा चंद्राचा ग्रास घेतात, म्हणजे गिळतात. त्या दिवशी ते ते ग्रहण होते. राहू-केतू हे ज्योतिष शास्त्रात छायाग्रह मानले आहेत. ते एक स्वतंत्र शास्त्र आहे.

विशालबुद्धि वेदव्यास यांना ब्रह्माडांतील या ग्रहगती घटनाकर्माचे दिव्यज्ञान असले पाहिजे. महर्षी व्यासांनी महाभारतात जयद्रथ वध कथा लिहून हे सिध्द केले आहे. अर्जुन पुत्र अभिमन्यूचा वध जयद्रथाने केला अर्जुनाने प्रतिज्ञा केली की "सूर्यास्तापूर्वी जर जयद्रथाचा वध न केला तर तो आत्मदहन करेल !" दुसरे दिवशी जयद्रथ-अर्जुन युध्द सुरू झाले. जयद्रथ म्हणजे आपल्या साधनेचा अहंकाररूपी जय्यत रथ होय. व अर्जून म्हणजे आपल्या लक्ष्यावर छेद करणारा. साधकाने आपल्यातील अहंकार घालवण्यासाठी लक्ष केंद्रित केलेच पाहिजे. ते साध्य करण्यासाठी भगवान साह्य करणारच. मध्यान्हात सूर्यास्त झाल्या सारखा काळोख पडला होता. हेच ते सूर्यग्रहण ! भक्त अर्जुनास आत्मदहन करावे लागणार, एवढ्यातच सूर्यग्रहण सुटते. ज्ञानाचा प्रकाश सूर्य एकाएकी तेजाने तळपू लागला. तेंव्हा लगेच सद्सद्विवेकबुद्धी परमेश्वर श्रीकृष्ण म्हणतात "अर्जुना, हा सूर्य आणि हा जयद्रथ !" अर्जुनाची प्रतिज्ञा पूर्ण झाली. व्यासरचित जयद्रथ वध कथा व सूर्य ग्रहण म्हणजे ज्ञान आणि विज्ञान मिलाफाची मार्गदर्शक कथा होय.

संदर्भ :- श्रीमत् भगवत् गीता - योगी मनोहर                         

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.

 https://vaidik-vishwa.blogspot.com/

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी