वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा-भक्ति व ज्ञान

प्रश्न क्र. 4 :- भक्ति ज्ञान यांचा समन्वय कसा साधता येईल ?

भक्तिमार्ग सोज्वळ असून अहंकार रहित साधना होय. भक्त म्हणजे जोडणे. शिष्याने गुरुशी, जिवाने आत्म्याशी, आत्म्याने परमात्म्याशी जोडणे म्हणजे भक्त होणे होय. ही जोडण्याची भावावस्था म्हणजे भक्ती, हा मार्ग भक्तिमार्ग आहे. नाम, जप, पूजा, श्रवणपद्धतीने भक्तिमार्ग होतो. गुरू हाच परमेश्वर मानणे. परमेश्वर हा शून्य निराकार आहे. पण सामान्य माणसास कोठेतरी नम्र होऊन भाव ठेवण्यास जागा आवश्यक असते. म्हणून गुरुचरणी भक्तिमार्गी नतमस्तक होतो.

अहंकार नष्ट करणे, म्हणजेच ज्ञानाची पहिली पायरी होय. मी कोणी नाही, माझे शरीर प्रकृतीने निर्माण केले आहे, मी म्हणजे आत्मा. हे ज्ञान प्राप्त झाले की, हे माझे, ते माझे, म्हणण्यापेक्षा माझे धन, सर्वस्व वगैरे सर्व गुरूचरणी समर्पण करण्याची भावना असणे आवश्यक आहे. म्हणजे भक्तीत ज्ञान आणि ज्ञानात भक्ती ठेवणे आलेच. विश्वातील अनेक अवस्था ह्या ज्ञानाच्या पायऱ्या आहेत. आपली जी स्थिती असेल ती आनंदाने स्वीकारावी. ठेविले अनंते तैसेचि रहावे चित्ती असू द्यावे समाधान" भक्तिमार्गी स्वतःला रिकामा करतात.

गुरूवर श्रद्धा ठेवली तर गुरूकृपेमुळे अतींद्रिय अनुभव आपण होऊन येतात.

मी कोणी नाही हे ज्ञान प्राप्त करीन. भक्तिभावाने सर्व काही गुरूला समर्पण करणे, हेच खरे ज्ञान होय.

संदर्भ:- विश्वयोगी पूज्य काकाजींच्या गुरू-शिष्याच्या गोष्टीतील शंका समाधान

शब्दांकन :- अशोक जी सोनार.

मो.क्र. 8149044910

आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी संपर्क साधा. साधनेतील योग रहस्ये जाणण्यासाठी खालील लिंक सबस्क्राईब करा.  धन्यवाद !

https://youtube.com/channel/UCCR6ms15mfZsv1E-CJ6hKGA

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी