सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - 5
बालवयापासूनच अंगी असलेल्या अद्भुत शक्ती : जादूई शक्ती
एकदा घरी एक जादूगार आला आणि त्याने सगळ्यांना अनेक जादूचे प्रयोग करून दाखविले. काही प्रयोगांमध्ये जादूगाराची हातचलाखी होती, तर काही प्रयोगांमध्ये जादूगाराने संमोहन व मंत्रशास्त्राचा प्रयोग केला होता. वस्तू गायब करणे व पुन्हा प्रकट करणे, सर्वत्र सुगंध पसरविणे, विहिरीत दगड टाकून पुन्हा तोच दगड हातात आणणे, केसांतून नाणी काढणे, मिठाई काढणे अशा अनेक जादू त्या जादूगाराने दाखविल्या. घरची सर्व मंडळी अचंबित झाली. बाळला मात्र या जादूबद्दल विशेष काही आश्चर्य वाटले नाही. कारण ह्या सर्व गोष्टी आपण सहज करू शकतो असे बाळला सारखे वाटत होते. जादूगार गेल्यानंतर बाळने आईबाबांना सांगितले की हे प्रयोग तोसुध्दा करू शकतो. आईबाबांना आश्चर्य वाटले आणि कुतूहल म्हणून त्यांनी बाळला ते प्रयोग करून दाखविण्यास सांगितले. बाळने त्या0
जादूगाराप्रमाणेच एक दचंगड विहिरीच्या पाण्यात फेकला आणि तोच दगड पुन्हा त्याच्या छोट्याशा हातात आणून दाखविला. डोळे बंद करून काहीतरी मंत्र पुटपुटल्यासारखे केले आणि हातावर हात घासले तो काय, सर्वत्र सुगंधच सुगंध येऊ लागला. बाळचे हे अचमत्कार पाहून आईबाबांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. आईबाबांना आपले हे बाळ नावाचे आठवे अपत्य एक देवी व्यक्तिमत्व आहे याची पुन्हा एकदा प्रचिती आली.
अनाहत नादांचा अनुभव
ध्रुवबाळासारखे ध्यान लावण्याच्या प्रसंगानंतर बाळ एकांतप्रिय झाला होता. घराच्या बाजूला असलेल्या रानात जाऊन बाळ बरेचदा बसत असे व चिंतनमग्न होत असे. एकाग्र चित्ताने कुठल्यातरी गोष्टीवर विचार करत असे. असेच एकदा विचार करता-करता 'बाळ'ला अचानक घंटानाद ऐकू येऊ लागला, वेणूचा नाद ऐकू येऊ लागला, स्वर्गीय मृदंगासारखा नाद ऐकू येऊ लागला, मेघांचा गडगडाट ऐकू येऊ लागला, समुद्रातील लाटांचा जीव घाबरवणारा आवाज ऐकू येऊ लागला, कुणीतरी सुंदर गायन करत असल्यासारखे ऐकू येऊ लागले. प्रत्यक्षात घंटा नव्हती की वेणू नव्हती की मृदंग नव्हता की, आकाशात मेघही नव्हते. बराच वेळ या स्वर्गीय नावांचा अनुभव घेतल्यानंतर बाळने घरी येऊन आईला त्याबद्दल विचारले. राधाबाईंनी त्यास तो आवाज म्हणजे स्वर्गातील इंद्राने निर्माण केलेला अदृश्य घड्याळाचा नाद असल्याचे सांगितले. बाळच्या बाल मनाचे मात्र आईच्या या सांगण्याने पूर्ण समाधान होईना. तो पुन्हापुन्हा त्या नादांबद्दल विचार करत राही.
संत ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात सांगितले आहे की भक्ताची, योग्याची वा साधकाची कुंडलिनी जागृती ज्या वेळेस होत असते त्या वेळी वरीलप्रमाणे निरनिराळे अनाहत नाद भक्ताला ऐकू येतात. बाळला अशा प्रकारचे नाद ऐकायला येणे म्हणजे अनाहत नादाचीच अनुभूती होती.
/
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा