सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - विश्वात्मक वैदिकता

 -------------------------------

विश्वात्मक वैदिकता

-------------------------------

इराक, असिरिया, इजराइल आणि बलुचिस्थान ही देशनामे संस्कृत आर्यक, असुरालय, आर्यन आणि म्लेंच्छस्थान या शब्दांपासून क्रमशः झालेली आहेत. भगवान श्रीकृष्णाचा मित्र अर्जुन याचे एक नाव फाल्गुन होते. या पासून अफलगुनस्थान - अफगानीस्थान शब्द बनतो. आजही अफगानी लोक आपल्या नावापुढे 'खान' म्हणजे 'कान्ह' विशेषण लावून त्यांची वैदिक परंपरा सिद्ध करतात. हिन्देशियन आपल्या नावा अगोदर 'सु' हे विशेषण लावतात. जसे सुकानों (सुकर्ण), सुहार्तो (सुहृद), सुबांद्रियो (सुबानरीय) इ. पाकिस्तान आज जरी भारतापासून अलग झाला असला तरी त्याचे नाव संस्कृतच आहे. पक्कस्थान म्हणजे शुद्ध स्थान, आज ते स्वतःला इस्लामी समजत असले तरी पूर्वी ते वैदिकच होते.

युरोप खंडातील अधिकांश देशनामेही संस्कृतोद्भव आहेत. 'इंग्लद' हा शब्द 'अशिदलु' शब्दापासून झाला आहे. इंग्लंडमध्ये पूर्वी अग्निची पूजा होत असे असा इतिहास आहे. आयरलंद हा शब्द तर पूर्ण संस्कृत शब्द आहे. 'दल' शब्दाचे उलटीकरण करुन 'लंदु' हा शब्द बनतो. तसा तो इंग्लद शब्दामध्ये बनला आहे. आयरीश लोक स्वतःला सेरोस्तेत आयर (सारस्वत आर्य) म्हणवतात. तर इंग्रज लोक स्वतःचे पूर्वज 'दुवाइदू' (द्रविड) होते असे मानतात. दु म्हणजे शीघ्र व विदू म्हणजे जाणणे, ज्ञान संपादन करणे होय. म्हणून जे लोक शीघ्रपणे ज्ञानी होतात त्यांना अर्थातच द्रविद् म्हटले जाईल. दुविद् शब्दाचा अपभ्रंश उच्चार द्रविड आहे. वैदिक संस्कृती या दुविदांपासूनच उत्पन्न झाली व संपूर्ण जगभर पसरली. इंग्रजांचे पूर्वज अशाप्रकारे द्वविद् म्हणजे वैदिक होत. जर्मनीचे खरे नाव ट्युइश लैन्द आहे द्विशःदल म्हणजे दुयूईश दल व नंतर दुयूईश लॅद बनले. जर्मनी देशे दयान्यूब नदीच्या किनाऱ्यावर म्हणजे दोन दलावर वसला आहे. जर्मन लोक स्वतःला आर्य समजतात व ते खरेच आहे. फिनलैन्द, पोलंद, हॉलंद, चेकोस्लोवाकीया, रुमानिया, लिथुआनिया ही देशनामेही संस्कृतोद्भव आहेत व त्या देशांच्या बोलीभाषेत संस्कृतोद्भव शब्द सापडतात फ्रेंच भाषेमधील दशम परिमाण व मापन (मात्रा) संस्कृत शब्दाचेच रूप आहे.

स्पेनपासून बलुचिस्थानपर्यंतच्या बोलीभाषेत द्रविड भाषेतील शब्द सापडतात. लॅटीन देशात तर द्रविडांच्या वसाहती होत्या हे युरोपीय इतिहासकारही मानतात. लॅटिन भाषेतील सहस्त्रावधी शब्द शुद्ध संस्कृत किंवा तामिळ आहेत. इतकेच नाहीतर लॅटिन शब्दही तामिळ भाषेचे अपत्य आहे. प्राचीन तामिळ भाषेत, पूर्वी झालेल्या अवस्थेला लात आणि भाषेला तेनेगी म्हणतात. हे दोन लात आणि तेनेगी शब्द मिळून लातिन, लॅटिन शब्द झाला आहे. तामिळ शब्द तन् इल शब्दापासून बनला आहे. तन म्हणजे शरीर व इल म्हणजे जीव किंवा प्राण.

अमेरीका खंड आजपर्यंत एक दुर्लक्षित भूखंड मानले जात होते. परंतु ह्या भागातही परंपरेच्या खुणा आजही सापडतात. दक्षिण अमेरिकेमध्ये 'डंका' नावाचे प्राचीन साम्राज्य होते त्याची स्थापना भारतीय 'अय्यर' बांधवांनी केली होती. 'अंक' या शब्दापासून इंक शब्द बनला आहे. रावणाची राजधानी लंका या शब्दाशी इंका या शब्दाचे जे साम्स आहेत, ते अंक या शब्दामुळे याच प्रकारे दक्षिण अमेरिकेतील ब्राजिल देश हे संस्कृत ब्रजल शब्दाचे अपउच्चारण होय. मेक्सिको देशाला मय देश मानतात. तेथे तर गणेश, नाग व इतरही वैदिक देवतांची मंदिरे सापडली आहेत.

उत्तर अमेरिकेतील उत्तर-पश्चिम भूभागालाही 'अलास्का' म्हणतात, जे 'अलक्षा' या संस्कृत शब्दाचे अपभ्रंश उच्चारण आहे. हा भूभाग पूर्वी आशियाच्या उत्तर-पूर्व भूभागाशी जोडलेला होता जो नंतर भूगर्भ हालचालीमुळे आशियापासून विलग झाला. हिमाच्छादित असल्यामुळे हा भाग आशियन लोकांपासून दुर्लक्षित असावा म्हणजे अलाक्षा असावा. उत्तर अमेरिकेतील रेड इंडियन मंगोलियन वंशाचे आहेत. याचा स्पष्ट अर्थ असा की, मंगोलिया किंवा मंगलालयातून काही लोक आशियाचा इतर भू भाग, ज्याला बेहरिन (बर्हिन-बाहेरील) म्हणतात, ओलांडून अमेरिकेच्या उत्तर भागात पसरले. याप्रमाण रेड इंडियन वैदिक परंपरेचे पाईक असून आजही त्यांना इंडियन म्हणजे भारतीय म्हणतात.

आर्य-अनार्य हा असाच व्यर्थ बाद पश्चिमात्य विज्ञानांनी व इतिहासकारांनी निर्माण केला. द्रविडांना किंवा दाक्षिणात्यांना बळेच अनार्य बनवून त्यांनी भांडणे लावून दिली. मूलतः आर्य आणि अनार्य या नावाचे कोणतेही मानववंश नव्हते व आजही नाहीत. 'आर्य' हे व 'अ' म्हणजे पुढे पुढे जाणे, प्रगती करणे व आपले जीवन सुसभ्य, सुसंस्कृत करणे. जो याप्रमाणे वागेल तो 'आर्य' याच 'अरे' शब्दाच्या निरनिराळ्या छटा म्हणजे दक्षिण भारतातील अय्यर, नय्यर, मुदलअय्यर किंवा मुदलीयार, जर्मनांची हरू तर इंग्रजांची सर ही उपाधी..

याप्रमाणे एके काळी संपूर्ण संसार आर्य होता, द्रविड होता, वैदिक होता व आजही आहे. परंतु दुर्दैवाने सर्वांना याचे विस्मरण झालेले आहे. आज मानव तो कोणत्याही धर्म, पंथ अथवा संप्रदायाचा असो, तो प्रथमतः वैदिक आहे. ज्ञानी आहे.

वैदिक परंपरा व संस्कृतीची बैठक 'योगशास्त्र' आहे. 'नराचा नारायण' कशा प्रकारे होऊ शकतो याचे शास्त्रशुद्ध ज्ञान व विज्ञान योगशास्त्र आहे. योगशास्त्रात स्वतःची अनुभूती सत्य व प्रमाण मानली जाते जी सर्वांसाठी समान व सारखी आहे. केवळ पिंड संस्काराद्वारे तयाचे प्रगटीकरण भिन्न असते. अनुभूतींद्वारे शास्त्र बनते म्हणून वैदिक परंपरेत अशास्त्रीय भावना व कल्पनांना स्थान नाही. वैदिक परंपरा साधनाप्रवण आहे. साधनेशिवाय ज्ञान नाही व ज्ञानाशिवाय जीवन पूर्ण नाही, ही वैदिक परंपरेची धारणा आहे. यासाठी वैदिक जीवनात " साधना प्रमुख आहे जी प्रत्येक साधकाने प्रतिदिन करणे आवश्यक आहे. केवळ पुस्तके वाचून वा व्याख्याने ऐकून ज्ञान प्राप्त होत नसते. या प्रमाणे नित्य साधना व सुयोग्य चिंतन यातून ज्ञान प्रकट होत असते.

'वैदिक विश्व' हेच कार्य करु इच्छिते. देश विदेशातील सर्व लोकांनी ज्ञानमय जीवन व्यतीत करावे हेच "वैदिक विश्वाचे' स्वप्न आहे. या महान कार्यासाठी वैदिक विश्वाचे साधक आणि प्रचारक प्रथम स्वतः साधनांद्वारे ज्ञानसंपन्न होण्याचा प्रयत्न करतील. 'ब्रह्म जानाति इति ब्राह्मणः' 'ब्रह्म जाणेल तोच ब्राह्मण,' या उक्तीप्रमाणे स्वतः ब्राह्मण होतील व इतरांनाही ब्राह्मण होण्यास अनुकूल कतील. जागोजागी प्रवचने आणि साधनेद्वारा या प्रकाराचा प्रचार सुरु आहे. आजच्या वैज्ञानिक युगातील संत्रस्त मानवाला या वैदिक जीवनाची व तत्त्वज्ञानाची नितांत आवश्यकता आहे. याच इच्छेने वैदिक विश्व कार्यरत आहे.

वैदिक अथवा ज्ञानमय जीवनावर श्रद्धा किंवा प्रेम असणाऱ्यांना वैदिक विश्वाच्या कार्यास तन, मन, व धनानी हातभार लावावा, स्वतः वैदिक म्हणजे ब्राह्मण व्हावे व इतरांनाही त्याकरिता सहाय्य करावे हे निवेदन.


-डाॅ. दत्ताजी हरकरे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - चित्त, मन व बुद्धी