वैदिक विश्व प्रश्नोत्तर मंजुषा - साधकाचा पिंड धर्म व अनुवंशिकता
प्रश्न क्र. 35 :- साधकाचा पिंड धर्म व अनुवंशिकता, की जो पूर्वजांच्या जीनस् मधून प्राप्त होतो याचा काही संबंध आहे काय ? एकाच वंशवेलीतील वेगवेगळ्या पिंडधर्मीयांच्या व्यक्ती असू शकतील काय ? असू शकतात ! वंशवेलीचा विचार केला तर सर्रासपणे ऐकायला येणारे वाक्य 'कुळाच नाव काढलं किंवा कुळाला बट्टा लावला.' यावरून कुलाभिमान दिसतो. वंशपरंपरेने चालत आलेला कुळाचार सर्व कुळात पाळतात. कुळाचार करणे हा एक संस्कारांचा भाग आहे. ते पाळले तर संस्कार मनावर रुजले जातात नाहीतर 'येरे माझ्या मागल्या.' प्रयत्नांवर जीवात्म्याचे ऊर्ध्व व अधोगमन (Up and down) ठरते. आणि एकच वंशवेल वेगवेगळ्या पिंडधर्माने बहरलेली असते. म्हणून "माझा मुलगा माझ्यापेक्षा निराळ्या पिंडधर्माचा आहे असे म्हणतात." जीवात्मा गर्भाशी शत-प्रतिशत गुण जुळल्याची खात्री पटल्यावरच गर्भात प्रवेश करतो. मग त्याप्रमाणे गुण प्राप्त होणारच. पण प्रयत्नांनी त्यांत उत्क्रांति होऊ शकते. उत्क्रांतीनेच अमीबाचा मानव झालाय ना ! पण तसा प्रयत्न केला पाहिजे. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे.' प्रयत्न न करता उत्क्रांती शक्य न...