पोस्ट्स

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - योगनिद्रा (अवयव ध्यान)

------------------------------------- योगनिद्रा (अवयव ध्यान) ------------------------------------- योगनिद्रा म्हणजे योग्यांची निद्रा. याला कोणी शवासन म्हणतात, परंतु ते चुकीचे आहे. शवासनात श्रेष्ठ योगी आपल्या शरीरातून बाहेर निघून आपलेच शव आपल्या दिव्य डोळ्यांनी स्वतःच पाहू शकतो. योगनिद्रा करताना अवयव ध्यान केले जाते. अवयव ध्यानाने साधक अशा जागृत निद्रेत जातो की, साधकाचे शरीर तर निद्रावश होते, परंतु साधकाचा जीवात्मा जागृत असतो. यालाच योगनिद्रा असे म्हणतात. आपल्या शरीरामध्ये बरेच अवयव आहेत त्या प्रत्येक अवयवावर ध्यान केंद्रित करून व नंतर त्यावरून ध्यान काढून दुसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रीत करणे, परत त्यावरून ध्यान काढून तिसऱ्या अवयवावर ध्यान केंद्रित करणे. याप्रमाणे प्रथम उजव्या पायाचे सर्व अवयव, नंतर डाव्या पायाचे सर्व अवयव, त्यानंतर उजव्या हाताच्या अंगठ्या पासून खांद्यापर्यंतचे सर्व अवयव, तसेच डाव्या हाताचे सर्व अवयव, त्यानंतर मुख्य शरीराचे (धडाचे) सर्व अवयवांवर एकानंतर दुसरा अवयव असे ध्यान करून शेवटी 'सहस्रार' चक्रावर म्हणजेच डोक्यावर मधोमध ध्यान केंद्रित करून त्यामध्येच ध्यानमग...

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ॐकार षट्चक्रभेदन (ध्यान प्रक्रिया)

 ------------------------------------------------- ॐकार षट्चक्रभेदन (ध्यान प्रक्रिया) ------------------------------------------------- ध्यान प्रक्रिया नाकाद्वारे छातीमध्ये पूर्ण श्वास भरून घ्या. नंतर तोंडाने धीर गंभीर आवाजात ॐचा नाद करा त्या नादानुसंधानात प्रथम 'मुलाधार' चक्रावर ध्यान केंद्रीत करा. ॐ चा स्वर चालू द्या. ॐचा नाद करताना प्रथम तोंडाने ओ म्हणावे व श्वास संपताना मुख बंद करतांना लयबद्ध आवाजात मकार म्हणावा. नंतर परत खूप श्वास घेऊन उच्चा नाद करून प्रथम मूलाधाराला ध्यानानेच स्पर्श करून 'नाभिचक्रावर' ध्यान केंद्रित करा. ॐचा स्वर चालू ठेवा. पून्हा खूप श्वास घेऊन ॐचा नाद करून वरीलप्रमाणेच प्रथम 'मूलाधार' नाभिचक्राला ध्यानानेच स्पर्श करून 'हृदयावर' ध्यान केंद्रित करा. परत चौथ्यांदा श्वास घेऊन ॐच्या नादाबरोबरच मूलाधार, नाभी, हृदय या चक्रांना ध्यानानेच स्पर्श करून 'कंठावर' ध्यान स्थिर करा. पाचव्यांदा वरीलप्रमाणेच ॐच्या पाचही चक्रांना क्रमाने ध्यान स्पर्श करून 'भ्रूमध्यावर' ध्यान स्थिर करा. शेवटी वरील प्रमाणे ॐच्या नादाबरोबर मूलाधारा पास...

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - दोन अलौकिक योगसाधना

 --------------------------------------------------------------- योगी मनोहरांद्वारे दोन अलौकिक योगसाधनांची निर्मिती योगनिद्रा आणि षट्चक्रभेदन --------------------------------------------------------------- योगी मनोहरांचे नाव ऐकून आणि वैदिक विश्वचे नाव ऐकून अनेक तरुण साधक व मोठमोठ्या व्यक्ती योगी मनोहरांशी जोडल्या गेल्या होत्या. या साधकांना योगी मनोहर वेळोवेळी साधना शिकवत असत आणि आध्यात्मिक मार्गदर्शन करत असत. याच काळात योगी मनोहरांनी स्वत:च्या आध्यात्मिक अनुभवावरून दोन अलौकिक योगसाधनांची संगीताच्या माध्यमातून निर्मिती केली. त्या अलौकिक योगसाधना म्हणजे 'योगनिद्रा' आणि 'षट्चक्रभेदन' अखिल मानव समाजाच्या कल्याणासाठी योगी मनोहरांनी साधनांची निर्मिती केली होती. या दोन साधनांतून साधकाला आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक असे तिन्ही प्रकारचे लाभ होत असत. या साधना शिकविताना योगीजींनी स्वतः निर्माण केलेल्या या दोन अलौकिक योगसाधनांची माहिती त्यांच्याच शब्दांत अशी करून दिली आहे. ------------------------------------------------- ॐकार षट्चक्रभेदन (ध्यान प्रक्रिया) -----------------------...

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - विश्वात्मक वैदिकता

 ------------------------------- विश्वात्मक वैदिकता ------------------------------- इराक, असिरिया, इजराइल आणि बलुचिस्थान ही देशनामे संस्कृत आर्यक, असुरालय, आर्यन आणि म्लेंच्छस्थान या शब्दांपासून क्रमशः झालेली आहेत. भगवान श्रीकृष्णाचा मित्र अर्जुन याचे एक नाव फाल्गुन होते. या पासून अफलगुनस्थान - अफगानीस्थान शब्द बनतो. आजही अफगानी लोक आपल्या नावापुढे 'खान' म्हणजे 'कान्ह' विशेषण लावून त्यांची वैदिक परंपरा सिद्ध करतात. हिन्देशियन आपल्या नावा अगोदर 'सु' हे विशेषण लावतात. जसे सुकानों (सुकर्ण), सुहार्तो (सुहृद), सुबांद्रियो (सुबानरीय) इ. पाकिस्तान आज जरी भारतापासून अलग झाला असला तरी त्याचे नाव संस्कृतच आहे. पक्कस्थान म्हणजे शुद्ध स्थान, आज ते स्वतःला इस्लामी समजत असले तरी पूर्वी ते वैदिकच होते. युरोप खंडातील अधिकांश देशनामेही संस्कृतोद्भव आहेत. 'इंग्लद' हा शब्द 'अशिदलु' शब्दापासून झाला आहे. इंग्लंडमध्ये पूर्वी अग्निची पूजा होत असे असा इतिहास आहे. आयरलंद हा शब्द तर पूर्ण संस्कृत शब्द आहे. 'दल' शब्दाचे उलटीकरण करुन 'लंदु' हा शब्द बनतो. तसा...

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - विश्वात्मक वैदिकता

 ------------------------------ विश्वात्मक वैदिकता ------------------------------- संपूर्ण जग एकेकाळी वैदिक परंपराभिमानी कसे होते याची प्रचिती आजही देशांच्या नावावरुन इतिहासावरुन, आचार आणि परंपरा या मधून पाहणे माहितीपूर्ण व मनोरंजक होईल. रशियातील भाषाकोविद श्री. लेब सिलेन्को भारतात आले होते. त्यांचा भाषाशास्त्र, इतिहास व आचार परंपरांच्या अभ्यासाचा निष्कर्ष हा होता की, इसवीसनापूर्वी रशियात व युरोपात वैदिक परंपरेचे अवलंबन केले जात होते शिवाय आजही रशियन व युरोपयीन भाषांमध्ये शेकडा पन्नास टक्के शब्द संस्कृतोद्भव आहेत. कांही शब्द तर संस्कृत शब्दांचे भ्रष्ट उच्चार आहेत. जसे नाविक नेव्हीक, पथ-पाथ, सम सेम, अब्रहा, इत्यादी. श्रीयुत लेव सिलेन्को यांनी वैदिक जीवन प्रणालीच्या अभ्यास व प्रचारासाठी जगात काही शाखाही स्थापन केल्या आहेत. अफगाणिस्थानातील एका विद्वानांचे म्हणणे असे आहे की, रामायण हा इतिहास असेल तर तो त्यांच्याच देशात घडलेला आहे, कारण रामायण उल्लेखिलेल्या अयोध्या, शरयू आणि इतरही देश व नद्या त्यांच्या देशात आहेत. एक मुस्लिम देश असूनही हिन्दोशिया (इंडोनेशिया) स्वतःला 'रामायण देश' म्...

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - वैदिक विश्व

 ------------------------------- वैदिक विश्व'चा उगम ------------------------------- अनेक लोक योगी मनोहरांशी जोडले जात होते. योगी मनोहरांची कार्य करण्याची पद्धत सर्वांना अतिशय आवडू लागली होती. त्यांच्या योगशिबिरांतून अनेकांना अनेक प्रकारचे शारीरिक व मानसिक लाभ होऊ लागले होते. या संपूर्ण कार्याला एक साजेसे नाव देऊन जगापुढे आणण्याची सर्वांची इच्छा होती. योगी मनोहरांनी या संपूर्ण कार्याला अत्यंत विचारपूर्वक पद्धतीने 'वैदिक विश्व' असे नाव देण्याचे ठरविले आणि अशातऱ्हेने 'वैदिक विश्व' या कल्पनेचा उगम झाला. वैदिक विश्व या शब्दाचा आशय योगी मनोहर सांगत असत तो असा. 'विद' म्हणजे ज्ञान प्राप्त करणे आणि 'वैदिक' म्हणजे ज्ञान प्राप्त करून त्यानुसार आचरण करणे. 'विद' आणि 'वेद' म्हणजे ज्ञान. संपूर्ण विश्वाला ज्ञानमय करण्याचे योगी मनोहरांचे ध्येय आणि स्वप्न होते. म्हणूनच या संपूर्ण कार्याला योगी मनोहरांनी वैदिक विश्व असे सार्थ नाव दिले. संपूर्ण विश्वाला वैदिक बनविण्याचे महान ध्येय असणारे कार्य म्हणजे वैदिक विश्व ! वैदिक विश्व या कार्याला योगी मनोहरांनी ...

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - ज्ञानदानाचे महान कार्य

 ------------------------------------------------ ज्ञानदानाचे महान कार्याला सुरुवात ------------------------------------------------ योगी मनोहरांची आध्यात्मिक साधना तर काही वर्षांपूर्वीच पूर्ण झाली होती. पंचतत्त्वांची साकार निराकार अनुभूती, कुंडलिनी जागृती, अनेक देव-देवतांची दर्शने, अनेक आध्यात्मिक मंत्रसिद्धी, विश्वाचे मूळ कृष्णविवर व महाशून्य अवस्थेचा अनुभव, समाधी अवस्था, शवासन साधना, संपूर्ण विश्वाचे ज्ञान होणे, पूर्वजन्मस्मृती अशा अनेक आध्यात्मिक अनुभूती योगी मनोहरांनी प्रत्यक्षपणे घेतल्यामुळे त्यांचे आध्यात्मिक जीवन आता संपूर्ण ज्ञानाने परिपूर्ण असे झाले होते. त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झाल्या होत्या. आध्यात्मिक क्षेत्रातील एक अधिकारी पुरुष म्हणून सर्व त्यांना ओळखू लागले होते. योगी मनोहरांनी आता प्राप्त केलेल्या ज्ञानाचा समाज कल्याणासाठी उपयोग करण्याचे ठरविले. इथूनच एका महान कार्याची (वैदिक विश्व) सुरुवात होणार होती. प्राप्त केलेले ज्ञान समाजाला देण्याचे महान कार्य महर्षी वाल्मिकी, वेद व्यास, आद्य शंकराचार्य, ज्ञानेश्वर माउली इत्यादी महान पुरुषांनी सदैव केले. हीच शृंखला पुढे ...