पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

कुंडलिनी शक्ती- ज्ञान विज्ञान -21

उद्धरेदात्मनाऽत्मानं नात्मानंवसादयेत् I आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः I ( अ.६ – श्लोक ५ )               मनुष्याने स्वत:चा उद्धार स्वतःच्या प्रयत्नानेच करायचा असतो. स्वतःला अधोगतीस जाऊ देऊ नये. आपणच आपले बंधू व आपणच आपले शत्रू असतो.दुसरा किंचित सहाय्य करेल. उद्धार नव्हे. डोक्यावर हात ठेवून अथवा पत्राद्वारे कुंडलिनी जागृत करण्याचा प्रयत्न अशास्त्रीय अतएव भ्रामक आहे. केवळ भावना विवशतेमुळे कुंडलिनी जागृत झाल्यासारखी वाटेल पण खऱ्या अर्थाने ती जागृत होणार नाहीच. साधकांनी आपला विवेक सतत जागृत ठेवून साधना करावी. भावनेचा आवेग ओसरल्यानंतर, त्या व्यक्तिला व्यथाविकार उत्पन्न होऊन प्रसंगी त्या व्यक्तीचे अध:पतनसुद्धा होऊ शकते. रामकृष्ण परमहंस यांच्या चरित्रात याची अनेक उदाहरणे दिली आहेत. एक मुलगा कुंडलिनी जागृत होत असताना भावनातिरेकाने प्रत्येकाच्या पायाची धुली आपल्या माथ्याला लावायचा. त्याची ती अवस्था पाहून रामकृष्णांनी संबंधित लोकांना त्याला सांभाळण्यास सांगितले, अन्यथा तो मुलगा अध:पतित होईल असे स्पष्ट बजावले आणि झाले तसेच. काही दिवसानंतर तो मुलगा सर्व ...

कुंडलिनी शक्ती- ज्ञान विज्ञान -20

 उत्क्रांती गतीतून जीव गेल्यास क्रमाक्रमाने तो पूर्णत्वास प्राप्त करू शकतो. पण त्यासाठी आणखी अगणित काळ वाट पहावी लागेल. मानव देह उत्क्रांतीचे उच्चपद होय. पण अजून एक अती उच्च पद शिल्लक राहिले आहे आणि ते म्हणजे परमयोग्याचे परिपूर्ण शरीर होय. असल्या शरीरातील पेशीत स्पंदन करणारे गुणाणू परिपूर्ण गुणांनी प्रेरित राहतील म्हणून तो योगी सर्व उत्तम गुणांनी संपूर्ण असाच राहिल. त्याच्या मेंदूतील सर्व पेशीकेंद्रे पूर्ण विकसित व कार्यरत झाल्याने असला योगी सर्वात उच्च बुद्धिमान व ज्ञानी राहिल. सामान्य माणसातील पेशीगुणाणू व बुद्धिकेंद्रे अविकसित असतात. प्रकृतीने मानवास अगोदरच सर्व देऊन ठेवले आहे, पण त्याचा योग्य उपयोग मानव अज्ञानामुळे करू शकत नाही. त्यांचा योग्य उपयोग करण्याचा शास्त्रीय प्रयत्न म्हणजे कुंडलिनी जागृतीची साधना होय.                जडाच्या सर्व नियमांच्या वर जाऊन तो नित्य दिव्य अनुभव घेऊ शकतो. सर्व अनुभव घेऊन तृप्त झाल्यावर स्वेच्छेने तो देहत्याग करुन या जड जगताचा निरोप घेतो. त्याचे जड शरीर पंचतत्त्वात विलीन होते आणि आत्मरूप परमात्मा रूपात विलीन...

कुंडलिनी शक्ती- ज्ञान विज्ञान -19

प्रत्येक स्वर समूहाला धरून एक दिव्य स्पर्श गायक श्रोत्याला त्या दिव्य गंधस्वरूप रासक्रीडेचा अनुभव देत असतो. असल्या दिव्य अवस्थेत ‘वाहवा’ म्हणायला कोणीच देहभानावर नसतो. ‘देहभाव हरपला तुज पाहता विठ्ठला’ अशी सर्वांची अवस्था होऊन जाते. तसल्या दिव्य अवस्थेत भक्त भगवंतास आलिंगन देऊन धन्य होत असल्यास नवल नाही, असल्या गीताला ‘सम+गीत’ म्हणजे संगीत असे म्हटले आहे. गायक व श्रोता दोघेही सम म्हणजे एकरस होत त्या दिव्य गीताकडे गमन करीत असतात. नादब्रह्मातील हा स्पर्शगुण होय. भगवंताशी खेळली जाणारी गोपींची रासक्रीडा ती हीच होय! दिव्य सुगंध :                असल्या दिव्य स्पर्शावस्थेत असतानाच दिव्य सुगंधाचा सतत अनुभव येत असतो. घ्राणेंद्रियातील मखमली त्वचा असलेल्या पेशीतील तंतू स्वच्छंदाने नर्तन करीत असतात. या तंतुंवर गंधाचे कण आदळल्यास त्यातून जी मोड उत्पन्न होते, त्यावर  त्या गंधाची जाणीव अवलंबून असते. अशा दिव्य अवस्थेत प्रत्यक्ष गंधकण नाकात न जाताच त्यातील तंतुजाल त्या त्या मोडीवर येऊन मोडीला धरून साधकाला दिव्य सुगंध सतत येत असतात. प्रत्यक्ष पहावे तर जवळ उदबत्...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 18

सूर्यचंद्राच्या दर्शनाद्वारे त्यांचा नादही ऐकू येऊ शकतो. त्यामुळे साधक एका दिव्य नादानुसंधान अवस्थेत धुंद असतो. योगमार्गातील अनुभव दोन प्रकारचे असतात. एक शब्दानुविद्ध व दुसरा दृश्यानुविद्ध. सूर्याचा नाद, सागरांच्या लाटा किनाऱ्यावर आदळतात तसा जवळपास असतो.चंद्राच्या नादाची बरोबरी करणारा दुसरा नाद व्यवहारात नाही. तरीपण रातकिड्यांच्या नादासारखा तो असतो असे म्हणता येईल. ताऱ्यांच्या प्रकाशासह ताऱ्यांचे मंजूळ नाद ऐकू येतात. विविध रंग, विविध नाद असल्या नादांना अनाहत नाद असे म्हणतात. जे नाद कधीच नष्ट होत नाहीत. त्यांना अनाहत नाद असे म्हणतात. मुंगीचा चालण्याचा जो नाद तयार होत असतो तोही योगी ऐकू शकतो. म्हणूनच योगीसंत कबीरजी म्हणतात, ‘चींटीके पाँवमे घुंगरू बाधें, वो भी साहेब सुनता है’ झुरळासारख्या किड्यांचे लयबद्ध वृंद संगीत ऐकायला मिळते. फुलातील पराग पृथ्वीवर पडताना जो दिव्य मंद नाद येतो, तोही योगी ऐकू शकतो. असल्या नादब्रह्मात सदा तल्लीन झाल्यामुळे योगी आपल्याच दिव्य विश्वात मग्न असतो. त्यांना पोषाख, व्यवहार व खाण्यापिण्याचीही शुद्ध नसते.                दृश्...

कुंडलिनी शक्ती- ज्ञान विज्ञान -17

 मानवी मेंदू एक सर्वोच्च कर्षण यंत्र आहे. विश्वातील अन्यान्य सर्वच प्रक्षेपण त्याद्वारे मानवी मेंदू करू शकतो. आपले कार्य एकच असते आणि ते म्हणजे त्या त्या विषयाचे ध्यान प्रक्रियेद्वारे मेंदूत कर्षण करून त्या त्या दिव्य शक्तिंचे ज्ञान देणे होय. विश्वातील अनंत देवाण घेवाण असल्या ध्यान समाधिद्वारे सतत चालत असते. वरून शांत, पण आतून अतिशय वेग ! विश्व संचाराचा त्रिभुवनाचा एकाच क्षणात अनुभवणारा प्रचंड वेग ! कवी, कलाकार अन्वेषक आपापल्या विषयातच बुद्धी चालविल्यामुळे तज्ञ असतात. इतर विषयात ते इतरांसारखे नगण्यच असतात पण कुंडलिनी जागृत साधकाचे मेंदूतील सर्व बुध्दीकेंद्रे पूर्णत्वाने जागृत झाल्यामुळे कुंडलिनी जागृत साधक सर्वच क्षेत्रात सर्वोच्च असतो. यामुळे प्रत्येक भक्त, योगी अथवा संत उत्तम कवी, कलाकार, तत्वज्ञ व बुध्दिमान असतो. त्या त्या गुणावस्था प्राप्त करण्याकरिता त्याला प्रयास पडत नाहीत. विहंग अवस्था आल्यावर आता तो साधक पूर्ण विकसित झालेला असतो. पलीकडील अनंत विश्वाच्या सर्व घडामोडी जाणण्याकरिता तो आता सत्पात्र होतो. म्हणून कुंडलिनी जागृत अवस्था सर्वोच्च अवस्था नसून ज्ञान जाणण्याकरिता ती आव...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 16

शरीरातील पेशीपेशींमधील पूर्वीची गुणाणुरचना आता आपले पूर्वीचे सापेक्ष स्थान बदलून आवश्यक अशा नवीन सापेक्ष अवस्थेत येत असल्याने शरीरात विलक्षण दाह उत्पन्न होत असतो. उत्क्रांत अवस्थेत साधकाचे पूर्वीचे गुण बदलून नवीन उत्क्रांत आवश्यक गुण उत्पन्न होत असतात. तसे होत असताना पेशी-पेशीतील जुन्या अनुत्क्रांत गुणाणुरचना बदलून त्या स्थानी उत्क्रांत गुणरचना होत असल्याने असला दाह उत्पन्न होत असतो. लोहातील कण एकसारखे गरगर फिरत असतात. त्यामुळे ते लोखंड अतिशय तापते. तद्वत साधकाच्या शरीराची अवस्था होऊन अतिशय दाह उत्पन्न होत असतो. असला भयानक दाहाचा काल कुंडलिनी जागृतीच्या समयी जावाच लागतो. त्याला उपाय नाही. त्याकरिता आधी सांगितल्याप्रमाणे जप, औषध योजना करावी म्हणजे दाहाची मात्रा कमी होऊ शकेल. पुराणातील सगर राजाच्या सोळा सहस्त्र पुत्रांचे कपिल महामुनींचे शापामुळे भस्म होणे याच कुंडलिनी जागृतीच्या अनुभवाचे कथारूप वर्णन होय. भगिरथाचे प्रयत्न म्हणजे त्यावरील उपाय होते. त्याचा यौगिक आशय न कळल्यामुळे साधनेतील एका महान सत्याला आपला समाज वंचित झाला आहे. भगवान गोपाळकृष्णाने यमुनेतील भयानक विषारी कालियाचे मर्दन कर...

कुंडलिनी शक्ती- ज्ञान विज्ञान -15

आपण हे पहिले की कुंडलिनी जागृतीची प्रक्रिया शरीरातील सर्व पेशीपेशींमधून होत असते, एकाच स्थानातून नाही. मूलाधारात शरीरातील सर्व नाड्यांचे संचालन केले जात असल्याने फक्त मूलाधारातच कुंडलिनी असते असा गैरसमज झालेला दिसतो. पण कुंडलिनी सर्व शरीरात असते. असला हा बदल सर्व पेशीपेशींमधून होत असल्याने साधकाला त्याची जाणीव शरीरातील कणाकणांतून होत असते आणि म्हणून ती जाणीव भयंकर असते, सर्व शरीर पेटले आहे असे वाटते. कुंडलिनी जागृतीचे प्रकार कुंडलिनी जागृत होत असताना विभिन्न आवेगांचा अनुभव येत असतो. या आवेगांना धरून कुंडलिनी जागृतीचे विभिन्न चार प्रकार सांगितले आहेत. ते पुढील प्रमाणे आहेत. १) पिपीलिका २) दर्दुर ३) सर्प आणि ४) विहंग  १) पिपीलिका गती :                साधनेच्या उच्च अवस्थेत साधकाला असा भास होतो की तो ध्यानात असताना त्याच्या अंगावर खालून वर पिपीलिका म्हणजेच मुंग्या चढत आहेत असे त्याला वाटते. भ्रमाने साधक त्या मुंग्या झटकायला पाहतो. पण त्या प्रत्यक्ष मुंग्या नसून मुंग्या अंगावर चढण्याचा आभास असतो. त्याचे कारण अंगातील नव्याने उत्पन्न होणाऱ्या दिव्य...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 14

  कुंडलिनी जागृतीतील विज्ञान                आपल्या शरीरात अनेक पेशी असतात. त्यात वास्तव्य करणारे गुणाणु त्यांच्या मूळ रचनेला सोडून गुण परिवर्तनाकरिता आवश्यक ती गुणाणुरचना करतात.यालाच कुंडलिनी जागृती असे म्हटले आहे. कुंडलिनी जागृतीच्या असल्या गुणाणु बदलाचे ज्ञान होण्याकरिता आपल्याला लोखंडी तुकड्याचे चुंबकीकरण कसे केले जाते व ते होताना लोखंडी पट्टीत आतून काय फरक होतो याचे विज्ञान पहावे लागेल. कोणत्याही लोखंडात मुळचेच चुंबकत्व असते. त्यातील कणांच्या त्रिकोणी रचनेमुळे ते चुंबकत्व त्यात असून सुद्धा बाहेर पडत नाही. चुंबकत्वाच्या प्रयोगात त्या लोखंडी तुकड्यात बाहेरून चुंबकीय शक्ती ओतली जात नसून त्यातील त्रिकोणात्मक अणू रचना बदलून ती चुंबक निर्मितीकरिता आवश्यक अशा सरळ रेषेत होत असते. हा सिध्दांत विज्ञानात रूढ झालेला आहे. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा हे तत्व माहीत आहे. लोहातील प्रत्येक कणात असले लोहचुंबकत्व मुलत:च असते पण त्यातील कणांची रचना एकमेकांच्या ध्रुवांना आकर्षित करुन त्रिकोणात्मक झाल्या कारणाने प्रत्येक लोखंडात चुंबकशक्ती असून ती बा...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 13

 माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात याचे अतिशय सुंदर साहित्यिक वर्णन केले आहे. ते प्रत्येक साधकाने अवश्य वाचावे इतके सुंदरतेने ओथंबलेले दिव्य काव्य आहे. आता कुंडलिनी जागृत होते म्हणजे नेमके काय होते, त्याचा अंतर्बाह्य परिणाम व शारीरिक उलाढाली काय होतात याचे ज्ञान विज्ञान  सविस्तर पाहू. आजच्या अध्यात्मिक जगतात कुंडलिनी हा विषय फार बोलला जातो आणि कुंडलिनी जागृत करण्याची बरीच दुकाने देखील सुरू झाली आहेत. आश्चर्याची गोष्ट अशी की स्वत:ला बुध्दिवादी समजणारे लोकही अशांच्या मागे लागतात आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आपली कुंडलिनी जागृत झाली असे मनोमन मानतात. भारतात या विषयावर बुवाबाजी सरू झाली आहे, तर पाश्चिमात्य जगतात या बद्दल कुतूहल निर्माण झाले आहे. बऱ्याच पाश्चिमात्य लेखकांनी या विषयावर बरीच पुस्तके लिहिली आहेत; पण कोणालाच या विषयाचा ज्ञानमूलक अनुभव नसल्याने पुस्तकात उपयोगात आणलेल्या शोभिवंत व जबरदस्त शब्द प्रयोगाखेरीज त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.                 कुंडलिनी हा विषय प्रत्यक्ष अनुभवाचा आहे. कल्पना अथवा भंपकपणा करण्...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 12

 प्राणायाम आणि प्रत्याहार बुध्दीला शक्ती प्रदान करू शकतात. म्हणून आसनानंतर प्राणायामाचे महत्व योग शास्त्रात फार आहे. प्राणायाम                आपल्या ऋषिमुनींनी आपल्या शरीराचा बारीकसारीक अभ्यास केला. त्यांनी असे पाहिले की आपल्या शरीरात कणाकणात प्राणशक्ती संचरून आहे. हीच प्राणशक्ती सर्व विश्वात संचारलेली आहे. ‘पिंडी ते ब्रम्हांडी’ या न्यायाने आपल्या पिंडातील या प्राणशक्तीवर नियंत्रण आणून त्याची शक्ती वाढविल्यास योगी आपल्या शरीरासह सर्व विश्वावर नियंत्रण आणू शकतो. त्यांना असे आढळून आले की आपल्या शरीरात दोन प्रकारच्या मज्जासंस्था आणि त्याबरहुकूम वागणाऱ्या स्नायूसंस्था आहेत. त्यांना इच्छानुवर्ती आणि अनिच्छानुवर्ती असे म्हणतात. हाता-पायांच्या हालचाली इच्छेनुसार आपण करू शकतो. तर हृदय आणि तत्सम अवयवांचे संचालन आपण करू शकत नाही. फुप्फुस हा असा अवयव आहे की तो अनिच्छानुवर्ती तर आहेच पण अधिक ताण दिल्यास तो इच्छानुवर्ती सुध्दा होऊ शकतो. अधिक ताणून धरल्यास श्वास आपोआप सूरू होतो. या फुप्फुसावर अभ्यासाने नियंत्रण आणता आल्यास आपण आपल्यातील सर्व प्राणशक्तींवर ...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 11

 अन्य धर्मपंथीयांनी साधनेतील शुद्ध आचार विचारांचे रहस्य न ओळखल्यामुळे त्यांच्यात स्वैराचार, मद्यमांस खाण्याचे प्रकार धर्मसंमत मानले आहेत. खरा योगी कधीच मद्यमांस भक्षण करू शकत नाही कारण उत्क्रांतीत मानवी शरीराची दंतरचना आणि आतड्याची लांबी हेच दर्शविते की मद्यमांस मानवाचे अन्नपेय नाही. मानवाखालील लागून असलेले माकड, गाय, बकरी इत्यादी अनुत्क्रांत योनींचे खाद्य मद्यमांस नाही. वैदिक परंपरेनेच हे ओळखल्यामुळे वैदिक आचार परंपरेत मद्यमांसाचा निषेध आहे. इतर धर्मपरंपरेत मुद्दाम धर्मवचनांना धरून मद्यमांस पवित्र मानून ग्रहण केले जाते. मद्यमांस भक्षण करणारा साधक उत्क्रांत अवस्था प्राप्त करणारा उच्च साधक होऊच शकत नाही. धर्माच्या नावावर सर्वत्र पशु-व्यवहार चालला आहे, हे एक सत्य आहे. हिंदूंचा द्वेष करण्याची वृत्ती त्यांच्या धर्म शिकवणुकीची विकृती दाखविते. धर्माच्या नावावर सर्वत्र हैदोस घालून रक्तपात, जाळपोळ, बलात्कारासारखे सर्व प्रकार झाले आहेत व आजही होत आहेत. काही पंथातील लोकांना येनकेन प्रकारेण इतर मानवांना आपल्या कथित पवित्र धर्मात आणून आपली संख्या वाढवून आपल्या दयाळू परमेश्वराला त्या कृत्यांद्व...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 10

मानवी शरीर                          मागील सर्व मूढ अवस्थांचा त्याग करून मानव आता मर्यादित म्हणजे क्षिप्त झाला आहे. या पलिकडील विक्षिप्त आणि पूर्ण अवस्था त्याला प्राप्त करायच्या आहेत. निम्न योनीत पोटच मुख्य असते. त्या पोटाला भरण्याकरिता प्रकृतीने पाय दिले आहेत. पण त्या अवस्था योनींना मेंदू अतिशय लहान असतो. एवढा मोठा हत्ती, पण त्या हत्तीचा मेंदू मानवाच्या मेंदूपेक्षा कितीतरी पटीने लहान असतो. मोठा आणि विलक्षण सामर्थ्याचा मेंदू हे मानवाचे वैशिष्ठ्य आहे. मानवाचे उदर मात्र त्याच्या शरीराच्या मानाने लहान असते. या द्वारे नियती असे सांगू इच्छिते की मानवाने प्रकृतीकडून अतिशय अल्प घ्यावे पण आपल्या बुध्दी सामर्थ्याने प्रकृतीला खूप द्यावे. मानव जन्म या उच्च, उपकारक कार्याकरिता आहे हे ओळखणे आवश्यक आहे. इतर प्राण्यांपेक्षा मानवाची तंतूसंस्था अतिशय उत्क्रांत आणि गुंतागुंतीची असते. मानवाचा मेंदू एक ब्रम्हांडच आहे. मानवाने नियतीचा हा इशारा ओळखून आपल्या शरीराचा उपयोग करावा आणि तसे करण्याकरिताच नियतीने त्याला इतके उच्च धारणांचे स्वयंपूर्ण शर...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 9

 धर्माच्या नावावर स्वार्थ साधणाऱ्या लोकांना दारिद्र्य, अज्ञान आणि आत्मविस्मृती असल्या मानव जीवनाला मारक आचार विचारांची पर्वा नसते. ते आपला मोठेपणा दाखविण्याकरिता काय वाटेल ते करतील; पण स्वत:चे जीवन मात्र त्या आदर्शापासून वंचित ठेवतील. असल्या फसव्या पाखंडी लोकांचे जीवन असल्या नव विचारी व्यक्तींसमोर असल्याने ते अध्यात्म अथवा सुसंस्कारित जीवनाला दांभिक मानतात. अध्यात्माची कास धरून राजकारण करणाऱ्या अथवा राजकारणाचा आधार घेणाऱ्या अध्यात्मिक कार्यकलापाबद्दल आपणास कर्तव्य नाही. पूर्णत्व आणण्याकरिता आवश्यक अशा उत्क्रांतीच्या अग्रवत् मार्गाबद्दल आपणास विचार करायचा आहे. उच्चावस्थांकरिता निम्न अवस्थांचा त्याग केल्याशिवाय उत्क्रांती घडत नसते. उत्क्रांतीच खालच्या अनुत्क्रांत अवस्थांचा त्याग करायला लावते, जसे सुरवंट स्वत:भोवती कोष तयार करून काही काळ त्यात राहून त्यापेक्षा उच्च अशी फुलपाखराची अवस्था प्राप्त करतात, व निम्न सुरवंट अवस्थेचा नाश करतात. उत्क्रांतीच्या नियमानुसार न वागणाऱ्या योनीत आपल्या योनी-अस्तित्वालाच मुकावे लागते. प्राचिन डायनासोर इत्यादी भव्यकाय योनींना असाच स्वसंहार पहावा लागला. ...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 8

  इंद्रियांची क्षमता आणि दिव्यानुभूती                 एका सेकंदात २० ते २०,००० स्पंदने असणारे आवाजच आपल्या कानाला ऐकू येतात. कानातील पडदे २० अथवा २०,००० स्पंदनांच्या खाली अथवा वर असलेले आवाज ग्रहण करून त्याचे ज्ञान देऊ शकत नाहीत. योगमार्गाचा अभ्यास करून कानाची क्षमता वाढवून २० च्या खालील आणि २०,००० वरील कंपने कानाने ऐकण्याची शक्ती वाढविता येते. योगी कानाने पाहू शकतो आणि स्पर्शही करू शकतो. डोळ्यांची क्षमता वाढवून योगी पहाण्याच्या क्रियेद्वारे ऐकूही शकतो. म्हणून सूर्यचंद्रताऱ्यांच्या प्रकाशाद्वारे त्यांचे नादही ऐकू येऊ शकतात. असल्या नादांना अनाहत नाद असे म्हणतात. एवढेच नव्हे, तर शरीराच्या प्रत्येक इंद्रियाद्वारे पंचगुणात्मक म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यासारखे अनुभव घेऊ शकतो, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. वटवाघूळ रात्रीच्या काळोखात सुखनैव इतस्ततः उडत असते. रात्रीच्या काळोखात त्याला कसे काय दिसते या प्रश्नाचा उलगडा आता झाला आहे. उडताना वटवाघूळ आपल्या तोंडाद्वारे एकप्रकारचा स्वरातीत आवाज उत्पन्न करीत असते. तो आवाज समोरील वस्तू...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 7

चित्ताची एकाग्रता क्रमागत वाढल्याने डोळ्यांना पाणी येते. नंतरच्या काळात नेत्रांना पाणी येणे बंद होऊन नेत्र अर्धोन्मिलीत  म्हणजे अर्धवट बंद व्हायला पाहतात. काहींचे नेत्र पूर्णपणे बंद पडायला पाहतात. त्यामुळे पुन्हा नेत्र उघडण्याची इच्छाच होत नाही. नेत्रांची असली अवस्था उच्च होय. नेत्र बंद असूनही ज्योती अथवा वर्णपटल दिसू लागतात. काही दिवसानंतर स्तोत्र बंद पडायला पाहते. सर्व इंद्रिये मनाच्या खोल अवस्थेत जायला पाहतात, त्यामुळे मुख स्तोत्र म्हणण्यात रस घेत नाही. तशी अवस्था आल्यास स्तोत्र बळेच चालू करण्याचा अट्टाहास करू नये. अशी उन्मनी अवस्था बराच काळ राहते. आता मनातील विचार पांगुळतात. चित्त एक विषयक बनते. यानंतरची अवस्था म्हणजे मन मनाची कक्षा ओलांडून चित्त अवस्थेत जायला पाहते. मनावरील संस्कार नष्ट झाल्यास त्या उच्च शुध्द अवस्थेला चित्त असे म्हणतात. चित्त स्वस्थ झाल्याने श्वास सुध्दा बंद पडायला पाहतो. ही अत्युच्च प्राकृतिक अवस्था असते. त्यामुळे घाबरून न जाता तशाच श्वासविरहीत अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करावा. या उच्च अवस्थेला ‘अ-श्व’ अवस्था म्हणजे श्वासविरहीत अवस्था असे म्हणतात.   ...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 6

ध्यान प्रक्रियेद्वारे जे आराध्य असेल ते साधकांप्रत येत असते. ‘ध्य’ म्हणजे आराध्य आणि ‘आन’ म्हणजे स्वत:प्रत आणणे होय. मनाची घडणच अशी आहे की, ते कधीच एकाग्र होत नाही आणि ध्यानाकरिता तर मनाची एकाग्रता अत्यंत आवश्यक आहे. मग ही एकाग्रता कशी साधायची ? त्यावर गीता सांगते, 'असंशयं महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम् । अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते’ ॥ श्लोक. ३५ अ.६ ॥  अर्जुना, मनाचा निग्रह करणे कठीणच आहे, परंतु सततच्या अभ्यासाने व वैराग्याने मनोनिग्रह शक्य आहे. एकच साधना सतत केल्याने मनावर ते संस्कार नकळत परिणाम करतात आणि ते त्या संस्कारांना धरून राहते. मन म्हणजे अन्य काही नसून ग्रहण केले गेलेले स्थिर संस्कार होत. नवीन संस्कारांना ग्रहण करण्याकरिता जुन्या अवांछनीय संस्कारांना पुसावे लागते, परंतु जुने संस्कार दृढ झाले असल्याने ते निघता निघत नाहीत. जसजसा प्रयत्न करावा, तसतसे ते जुने संस्कार अधिक दृढ व्हायला पाहतात. त्याकरिता वैराग्य म्हणजे संस्कारावरील आसक्ती कमी करण्याचा अभ्यास करावा लागतो. वैराग्य म्हणजे आसक्तिरहित व्यवहार होय. ‘राग्य’ म्हणजे आसक्ती व ‘वै’ म्हणजे त्यावरील अवस्था होय. वैर...

कुंडलिनी शक्ती – ज्ञान विज्ञान - 5

सर्व जड वस्तू संधारणाचे सुक्ष्म अवस्थारूप म्हणजे ओत होय. ओतांची सर्वसापेक्ष स्पंदने संधारण करून परमाणू-अणू निर्माण होतात. अणूलाही त्याची एक संधारण गती असते, जी ओतांच्या स्पंदनांना अवगुंठीत करून प्राप्त होत असते. असली ओतस्पंदने मुक्त करून त्यांचा उपयोग दूरदर्शनात केला जातो. मानवी शरीरही  असल्या संग्रहीत स्पंदनांचे चक्रव्यूह असल्यामुळे तसा सुयोग्य प्रयत्न केल्यास मानवी चित्त आपल्या शरीररूप व मेंदूरूप उपकरणाद्वारे तसले सूक्ष्म अनुभव घेऊ शकते. सर्व दिव्य अनुभवांचे मूळ संचित केंद्र मानवी चित्त आहे. म्हणून योगी जड उपकरणाशिवाय दूरचे ऐकू शकतो, दूरचे पाहू शकतो, दूरचा स्पर्श करून त्या वस्तूंचा स्पर्श, गंध, चव इत्यादी दिव्य अनुभव घेऊ शकतो, परंतु त्याकरिता योग्याचे चित्त अतिशय साक्षपी अवस्थेत असावे लागते.                 मानवी शरीर सुद्धा मुंगीपासून माकडापर्यंतच्या सर्व उत्क्रांत अवस्थांचे सर्वश्रेष्ठ उत्क्रांत स्वरूप असल्यामुळे सर्व गत योनींचा अनुभव मानवी शरीर घेऊ शकते.एकपेशीय जीव अमीबा जडकर्बाचे संस्कारीत अवस्थेपासून उत्पन्न झाला असे  मानण्या...

सद्गुरु योगिराज मनोहर हरकरे जीवन चरित्र - आध्यात्मिक प्रगती

 ------------------------------------------------------------ आध्यात्मिक प्रगती आणि खालावणारी आर्थिक स्थिती ------------------------------------------------------------ योगी मनोहरांची आध्यात्मिक प्रगती अतिशय वेगाने सुरू होती. सर्व तत्त्वांची साकार निराकार दर्शने, अनेक देव-देवतांची दर्शने, संतमहात्म्यांची दर्शने, कुंडलिनी जागृती, विश्वाच्या मुळाचे रहस्य, महाशून्य अवस्था, समाधी अवस्था अशा अनेक गोष्टी त्यांना वेगाने प्राप्त होत होत्या. या सगळ्या अनुभवांमध्ये वायुतत्त्वाचा अनुभव मात्र फार कष्टदायक होता असे योगी मनोहर सांगत. वायुतत्त्वाचा अनुभव म्हणजे एका क्षणात संपूर्ण ब्रह्मांडाचा प्रवास. हा अनुभव घेताना मोठमोठे योगी तो आवेग सहन न झाल्यामुळे शरीर त्यागतात. परंतु योगी मनोहरांनी हा भयानक आवेगही पचवला होता. परंतु असे करताना त्यांना भयानक शारीरिक पीडा सहन करावी लागली होती. ही पीडा सहन करताना त्यांना एक दिवस एका झाडाखाली एक योगीपुरुष भेटले आणि त्यांनी सांगितले की "घाबरू नको, तुझी या अवस्थेतून ज्ञानेश्वर माउली सुटका करतील". ज्ञानेश्वर माउलींनीच त्यांची पुढे यातून सुटका केली आणि योग्य ...